Bharat Jodo Yatra In Mahrashtra News, Aurangabad
Bharat Jodo Yatra In Mahrashtra News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Marathwada : नांदेड, हिंगोली जिल्ह्यात आठवडाभर असणार भारत जोडो यात्रा..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : काॅंग्रेसचे नेते राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या चांगलीच गाजते आहे. राहूल गांधी यांची कित्येक किलोमीटरची पायपीट आणि त्यात सर्वसामान्यांना सोबत घेत ढवळून काढलेले वातावरण हे याचे वैशिष्ट ठरत आहे. ही यात्रा महाराष्ट्रात ७ नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील देगलूर मार्गे दाखल होणार आहे. त्यानंतर नांदेडसह हिंगोली जिल्ह्यात मार्गक्रमण करत आठवडाभराने ती विदर्भातील वाशिम जिल्ह्यात दाखल होणार आहे.

७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. (Rahul Gandhi) तामिळनाडूतील कन्याकुमारी पासून सुरू झालेल्या या भारत जोडो यात्रेचा प्रवास केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, हरयाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि पंजाब असा असणार आहे. (Nanded) या भारत जोडो यात्रेसाठी राज्यातील काॅंग्रेस नेत्यांनी जय्यत तयारी केली आहे. बैठका आणि मेळाव्यांच्या माध्यमातून भारत जोडो यात्रेचा झंझावात मराठवाडा आणि महाराष्ट्रभर पसरवण्याचा काॅंग्रेसचा प्रयत्न असणार आहे.

जाती-धर्मात व समाजात फूट पाडणारे राजकारण संपवून देशाला एकजूट करणे हा यात्रेचा उद्देश असल्याचे सांगितले जाते. राहूल गांधी यांच्या या मोहिमेला देशभरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतो आहे. ७ नोव्हेंबरला देगलूरमध्ये दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता देगलूर बसस्थानक परिसरात यात्रा पोहचेल.

त्यानंतर बिलोली तालुक्यातील खतगांव फाटा. तिसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता शंकरनगर येथून यात्रेला पुन्हा प्रारंभ होईल. नायगांव येथील कुसम लाॅन येथे कार्यकर्ते, पदाधिकारी जमतील आणि यात्रा पुढे मार्गस्थ होईल.

नांदेड दक्षिण, कंधार, लोहा, नांदेड उत्तर, भोकर आणि हदगांवमधून ही यात्रा ११ नोव्हेंबरला कळमनुरीतून हिंगोली जिल्ह्यात दाखल होणार आहे. १२ ते १५ नोव्हेंबर दरम्यान हिंगोली जिल्ह्यातील विविध भागातून ही यात्रा मार्गक्रमण करत १५ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता अंजनखेड, बोराला फाटा येथून वाशिम जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT