Salman Khan Threat
Salman Khan Threat Sarkarnama
मराठवाडा

Salman Khan Threat : सलमानला धमकवणाऱ्या बिश्नोई गँगचे मराठवाडा कनेक्शन उघड; वसीम चिकना पोलिसांकडून अटक

सरकारनामा ब्यूरो

Chhatrapati Sambhajinagar News : प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता सलमान खान याला धमकाविणारा आणि देशामध्ये दहशत असलेल्या बिश्नोई गँगचे छत्रपती संभाजीनगरचे कनेक्शन समोर आले आहे. बिश्नोई गँग साठी रेकी करणे शस्त्रांच्या डीलिंग करण्याची जबाबदारी वसीम चिकना याला देण्यात आली होती. ही माहिती मिळताच पनवेल पोलिसांनी वासिमला छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली होती. अटक करण्यात आलेला वसीम हा जालना जिल्ह्यातील असून त्याचे आता छत्रपती संभाजीनगर शहराचे बिष्णोई गँग कनेक्शन उघड झाले आहे.

प्रसिद्ध गायक सिद्धू मूसे वाला खून प्रकरण, खून, खंडणी यासह बॉलीवूड अभिनेता सलमान खान याला जीव मारण्याची धमकी देणारी गॅगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँग देशभरात वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत येत असते. या गँगची देशभरामध्ये मोठी दहशत आहे. याच बिश्नोई याचे आता छत्रपती संभाजीनगर कनेक्शन समोर आले आहे. लॉरेन्स बिश्नोई याच्यासाठी रेकी करणे, शस्त्रांच्या बिलिंग हे काम छत्रपती संभाजीनगर येथील वसीम मोहम्मद उर्फ वसीम चिकना हा करत होता.

सलमान खानच्या घरावर रेकी करण्यासाठी या परिसरामध्ये रूम शोधण्याचे काम त्याने सांगितले होते, सांगत होता अशी माहिती सूत्रांच्या आधारे पोलिसांना मिळाली आहे. शहरातील जालानगर परिसरातील अलंकार अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या मोहम्मद उर्फ वसीम चिकना याला पनवेल पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतले आहे. सलमान खानला धमकी दिल्याचा प्रकार समोर आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात लक्ष घालत गुन्हेगारांना शिक्षा करण्याच्या सूचना पोलिस (Police) यंत्रणेला दिले होते. त्यानुसार पोलिसांनी या प्रकणाचा तपास करण्यास सुरूवात केली आहे.

पोलिसांनी सलमान खान धमकी प्रकरणी आतापर्यंत पाच आरोपी अटक केले आहेत. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता या गुन्हेगारांकडून वसीम चिकना याचे नाव समोर आलं होतं. या माहितीच्या आधारे पनवेल पोलिसांनी तातडीने पावले उचलत छत्रपती संभाजीनगर पोलिसांची संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या मदतीने जालानगर परिसरामध्ये राहणाऱ्या वसीम चिकना याला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी करण्यास सुरुवात केली असून यामधून महत्वाची माहिती समोर येईल, असा विश्वास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT