मराठवाड्यातील धरणं भरल्याने पाणी सोडण्यात आले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पावसाचा जोर कायम असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासनाला प्रत्यक्ष फिल्डवर काम करण्याचे आदेश दिले आहेत.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे.
Marathwada Heavy Rainfall : पाण्यासाठी तरसणाऱ्या मराठवाड्यावर यंदा एवढी आभाळ माया झाली की जणू आभाळंच फाटलं. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्याची वेळ यावेळी निसर्गाने आणली. लाखो हेक्टर शेत जमीन, त्यावरील पीकं, जनावरे, घरं वाहून गेली. शेतीच्या शेती खरवडून गेली असताना पावसाचा जोर अजूनही कायम आहे. धरणं तुडुंब भरली आहे, नदीकाठची गावं वाहून जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला प्रत्यक्ष फिल्डवर उतरून काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांनी आज मराठवाड्यासह (Marathwada) राज्यभरातील पूरस्थिती, अतिवृष्टी आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. प्रशासन म्हणून करावी लागणारी मदत, त्यासाठीच्या यंत्रणेला अलर्ट राहण्याचे आदेश फडणवीस यांनी बैठकीत दिले. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी हे 8 जिल्हे तसेच सोलापूर येथील जिल्हाधिकार्यांशी आज सकाळी संपर्क करुन पावसाच्या, मदतकार्याच्या स्थितीचा आढावा त्यांनी घेतला.
प्रत्येक ठिकाणी मदतकार्यात केल्या जात असलेल्या उपाययोजना जाणून घेत त्यांना काही सूचनाही केल्या. मदत शिबिरांमध्ये भोजन, पाणी आणि आरोग्याच्या योग्य व्यवस्था राखण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. काही जिल्ह्यात चारा टंचाई असल्याने तातडीने चारा पुरवण्याचेही आदेश दिले आहेत. पावसामुळे (Heavy Rainfall) धरणांचे विसर्ग वाढविले जात असताना नागरिकांना आधीच सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यास सुद्धा त्यांनी सांगितले आहे.
सर्व अधिकार्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर राहून काम करावे, अशाही सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी जलसंपदा विभागाकडून राज्यातील विविध भागातील धरणांच्या विसर्गस्थितीचा आढावा घेतला असून, स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत आणि सतर्क राहून काम करण्याचे आदेश विभागाला दिले आहेत. यामुळे मदत शिबिरात आधीच स्थलांतरित नागरिकांना तेथेच थांबविण्यात आले आहे.
धरणं झाली ओव्हर फ्लो..
मुसळधार पाऊसाने मराठवाड्याती धरणं अक्षरशः ओव्हार फ्लो झाली आहेत. जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट आणि धरण क्षेत्रात झालेल्या सुमारे 150 मि.मी. पावसामुळे 1,25,000 क्युसेक इतका विसर्ग गोदावरी पात्रात करण्यात येत आहे. हा विसर्ग दीड लाख क्युसेकपर्यंत जाऊ शकतो, अशी स्थिती आहे.
तर बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणातून 41,701 क्युसेक इतका विसर्ग केला जात आहे. हा पूर्वी 95,000 क्युसेक इतका होता, तो आता कमी करण्यात आला आहे. धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर, बीड येथील पावसाने सीना कोळेगाव येथून 75,000 क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. काही ठिकाणाहून तो 60,000 क्युसेक इतकाच आहे. तर उजनीमधून 1 लाख क्युसेक इतका विसर्ग होतो आहे.
प्र.१. मराठवाड्यात कोणती धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत?
उ. जायकवाडीसह अनेक प्रमुख धरणं पावसामुळे भरून वाहू लागली आहेत.
प्र.२. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय आदेश दिले आहेत?
उ. त्यांनी प्रशासनाला प्रत्यक्ष फिल्डवर उतरून पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
प्र.३. नागरिकांनी कोणत्या उपाययोजना कराव्यात?
उ. नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
प्र.४. पावसाचा जोर किती दिवस राहणार आहे?
उ. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.
प्र.५. प्रशासनाने कोणती तयारी केली आहे?
उ. आपत्ती व्यवस्थापन पथके, बचाव पथके आणि स्थानिक अधिकारी सतत फिल्डवर काम करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.