Central Minister Dr.Bhagwat Karad On Street News, Aurangabad
Central Minister Dr.Bhagwat Karad On Street News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Marathwada : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री कराडांची रस्त्यावरील विक्रेत्यांकडून दिवाळीची खरेदी..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे आज चक्क रस्त्यावर लक्ष्मीपूजनाचे साहित्य खरेदी करतांना दिसले. हातगाडी आणि रस्त्यावर बसून लाह्या, बत्ताशे, केरसुणी, पणत्या विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून त्यांनी ही सगळी खरेदी केली. विशेष म्हणजे मोदींच्या डिजिटल इंडियाचा प्रचार देखील त्यांनी यानिमित्ताने केला.

लक्ष्मीपूजनासाठीच्या साहित्याची खरेदी केल्यानंतर त्यांनी विक्रेत्यांना डिजिटल ॲपच्या माध्यमातून पैसे देत डिजिटल व्यवहाराचा प्रसारही केला. (Dr.Bhagwat Karad) कराडांच्या या खरेदीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच होत आहे. केंद्रात अर्थ राज्यमंत्री झाल्यानंतर कराडंकडून डिजिटल बँकेसह ग्रामीण भागांमध्ये बँकेच्या शाखा उघडण्यावर कायमच भर राहिला आहे.(Marathwada)

केंद्रात महत्त्वाची जबाबदारी मिळाल्यानंतर बँकांच्या माध्यमातून मोदी सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार त्यांनी केल्याचे दिसून आले. मंत्रीपदाचा कुठलाही बडेजाव न दाखवता आपल्या डॉक्टरी पेशाला जागत अपघातग्रस्तांना जागेवर उपचार देताना देखील कराड अनेकदा दिसले. अगदी विमानातील सहप्रवाशाला उपचार देऊन त्यांनी बरे केल्याचे देखील आपण पाहिले.

असाच काहीसा साधेपणा ्यांनी दिवाळीची खरेदी रस्त्यावरील सामान्य विक्रेत्यांकडून करत दाखवला. शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या गुलमंडी भागात लक्ष्मीपूजनासाठीचे साहित्य कराड यांनी खरेदी केले. विशेष म्हणजे याचे पैसे त्यांनी डिजिटलच्या माध्यमातून देत याचा वापर अधिकाधिक करण्याचे आवाहन देखील केले. केंद्रीय मंत्री हातगाडी आणि रस्त्यावर बसलेल्या विक्रेत्यांकडून खरेदी करत आहेत हे पाहून उपस्थितांना त्यांचे कौतुकही वाटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT