Sandipan Bhumre News, Aurangabad
Sandipan Bhumre News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Marathwada : पाचवेळा आमदार, दोनदा मंत्री झालेल्या भुमरेंच्या मतदारसंघात शिवसेना जोर लावणार..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : शिवसेनेच्या तिकीटावर पाचवेळा आमदार अन् दोनवेळा मंत्री झालेले विद्यमान रोहयो मत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघात शिवसेनेने जोर लावायला सुरूवात केली आहे. पैठण विधानसभा मतदारसंघ हा कायम शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे. संदीपान भुमरे यांनी शिंदे गटासोबत जात केलेली गद्दारी पैठणकरांना आवडलेली नाही हे आदित्य ठाकरे यांच्या दोन शिवसंवाद दौऱ्यातून स्पष्ट झाले आहे.

भुमरेंकडून शिंदेच्या सत्कार सोहळ्याला जमवलेल्या गर्दीचा दाखला दिला जात असला, किंवा बंडानंतर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेल्या विजयाचे कितीही डोल बडवले जात असले तरी प्रत्यक्षात मतदारसंघातील परिस्थिती वेगळी आहे. (Shivsena) संधी मिळताच मतदार भुमरेंना हिसका दाखवतील असा दावा शिवसेनेकडून केला जातोय. (Rohit Pawar)

मध्यावधी निवडणुकीची चर्चा सुरू असतांनाच शिवसेनेकडून शिंदे गटातील आमदार, मंत्र्यांच्या मतदारसंघात नेत्याचे दौरे वाढले आहेत. संदीपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात आदित्य ठाकरे स्वतः दोनवेळा येवून गेले. त्यानंतर आता उपनेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे देखील मेळाव्याच्या निमित्ताने पैठणमध्ये येणार आहेत. सुषमा अंधारे या उद्धवसेनेच्या फायरब्रॅन्ड नेत्या म्हणून ओळखल्या जात आहेत.

त्यांनी शिंदे सरकारमधील सगळ्याच मंत्र्यांवर आपल्या शैलीत टीकेची झोड उठवली आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि त्यांच्यात रंगलेला कलगितुरा राज्यात चांगलाच गाजला. त्यातूनच सभेला परवानगी नाकारण्यासारखे प्रयोग सुरू झाले. असे असले तरी उद्धवसेनेने आता गद्दारांच्या विरोधात अधिक आक्रमक होण्याची रणनिती आखल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत तुरूगांतून बाहेर आल्यानंतर उद्धवसेनेचे बळ अधिक वाढल्याची चर्चा आहे. त्यामुळे जे जे लोक उद्धव ठाकरेंचे सरकार पाडण्यास कारणीभूत आहेत, त्या सर्वांना धडा शिकवण्याचा निर्धार करत नेत्यांचे दौरे सुरू झाले आहेत.

संदीपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात येत्या १८ नोव्हेंबर रोजी सुषमा अंधारे या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. तर २२ नोव्हेंबरला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे देखील एका मेळाव्याला हजेरी लावणार आहेत. शिंदेगटात गेल्यानंतर भुमरे यांनी जिल्ह्यातील उद्धवसेनेच्या नेत्यांच्या आपल्या भाषेत समाचार घेतला होता.

चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांच्यावर तर एकेरी भाषेत भुमरेंनी अनेकादा टीकास्त्र सोडले. त्यामुळे आता भुमरेंना देखील त्याच भाषेत उत्तर देण्याची आणि पैठण मतदारसंघात नव्याने शिवसेनेची मजबुत बांधणी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी नेत्यांची फौजच उभी केल्याचे चित्र आहे. आता याचा सामना शिंदे गट कसा करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT