Georai Assembly Election Sarkarnama
मराठवाडा

Georai Assembly Election : युतीधर्म पाळा, भुलथापांना बळी पडू नका : पंकजा मुंडे

Georai Assembly Election : अमरसिंह पंडितांकडे विकासाची दूरदृष्टी असल्याने सिंदफणा नदीच्या बॅरिजेस उभारणी

सरकारनामा ब्यूरो

Georai Assembly Election : राज्यामध्ये महायुतीचे सरकार आणण्यासाठी महायुतीचे सर्व आमदार निवडून येणे आवश्यक आहे. दिवंगत मुंडे आमदारांची फॅक्टरी होते. मीही त्यांचीच मुलगी असून जिल्ह्यातील सर्व आमदार मला निवडून आणायचे आहेत.

मी कोणताही उमेदवार उभा केला नाही, भुलथापांना बळी पढू नका, मी युती धर्मच पाळणार व युती धर्म पाळून विजयसिंह पंडित यांना विक्रमी मताने  विजयी करा, असे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजा मुंडे यांनी केले.

गेवराई मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ चकलंबा येथे पंकजा मुंडे यांची सभा झाली. अमरसिंह पंडित, भाऊसाहेब नाटकर, प्रकाश सुरवसे, उद्धव खाडे, किशोर कांडेकर, रविकांत राठोड, कडूदास कांबळे, डॉ. विजयकुमार घाडगे, शेख तय्यब, शेख खाजा, ॲड. राहुल राका, गणेश खेडकर उपस्थित होते.

पंकजा मुंडे म्हणाल्या, विकास कामे ही सरकारने निधी दिल्याने व वरिष्ठांनी सहकार्य केल्याने होत असतात. त्याला मी केले मी केले असे म्हणणे म्हणजे अहंकारच, अशी टिका त्यांनी लक्ष्मण पवार यांच्यावर नाव न घेता केली.

अमरसिंह पंडितांकडे विकासाची दूरदृष्टी असल्याने त्यांच्या आमदारकीच्या काळात सिंदफणा नदीच्या बॅरिजेस उभारणी झाली. तेच ध्येय घेऊन विजयसिंह पंडित तालुक्याच्या विकासासाठी निवडणूक लढवत आहेत.

मी त्यांच्यासोबत सहकार्य करेल व या भागाच्या विकासासाठी भरीव असे योगदान देईल. या भागातील माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांना सहकार्य करावे. अमरसिंह पंडितांनी मला शब्द दिला आहे की, मुंडे साहेबांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मानच राखला जाईल.

त्यामुळे विजयसिंह पंडित यांना विजय करणे हे माझे ध्येय आहे. या ठिकाणी मी ज्यांची सभा घेते त्यांचा विजय नक्की होतो, असा विश्‍वासही पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. विरोधक अपप्रचार करत आहेत.

मी कोणालाही शब्द दिला नाही. त्यामुळे कुठल्याही भूलथापांना बळी न पडता उद्याच्या निवडणुकीमध्ये विजयसिंह पंडित यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT