Graduate Constituency Election; Satish Chavan Sarkarnama
मराठवाडा

Legislative Council Election : महायुतीकडून विधानपरिषदेच्या आणखी एका उमेदवाराची घोषणा : राष्ट्रवादीच्या वाट्याला पाचपैकी एकच मतदारसंघ

Satish Chavan Marathwada Graduate Constituency Election : महायुतीकडून सतीश चव्हाण यांना मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी महायुतीकडून देण्यात आली आहे.

Aslam Shanedivan

Marathwada Graduate Constituency Election News : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीसाठी महायुतीकडून विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या वाट्याला पाचपैकी एकच मतदारसंघ आल्याचे समोर आले आहे. तर चव्हाण यांनी महायुतीतील सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानत, पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार असल्याचे म्हटले.

गेल्या सहा वर्षांच्या कामाचा लेखा जोखा मतदारांसमोर मांडत आलो असून, बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीनुसार पदवीधर मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी यापुढेही काम करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी आमदार चव्हाण दिवंगत सहकाऱ्याच्या आठवणीने भावूक झाले. त्यांनी, त्यांच्या विना ही निवडणूक लढवावी लागेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते, अशी भावना व्यक्त केली. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा आणि मत मागण्याचा अधिकार आहे. मात्र अंतिम निर्णय मतदारच घेईल, असेही चव्हाण म्हणाले.

महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ केला जाणार असून, सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या १८ वर्षांच्या राजकीय आणि सामाजिक अनुभवाच्या जोरावर नव्या आव्हानांना सामोरे जाणार असून, विक्रमी मतांनी विजय मिळवण्याचा प्रयत्न राहील, असे चव्हाण यांनी सांगितले.

७६ तालुके आणि सुमारे १० हजार गाव

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात ७६ तालुके आणि सुमारे १० हजार गावांचा समावेश असल्याने या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

भाजप रिंगणा बाहेर

दरम्यान मराठवाडा पदवीधर मतदारसंघात आतापर्यंत भाजपविरुद्ध राष्ट्र्वादी-काँग्रेस आघाडी, महाविकास आघाडी अशी लढत झाली होती. 2008 पूर्वी हा मतदारसंघ भाजपकडे होता. माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड, श्रीकांत जोशी यांनी या मतदारसंघाचे ताकदीने प्रतिनिधित्व केले होते.

त्यानंतर मात्र सतीश चव्हाण यांनी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी आणि गेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवत तिसऱ्यांदा बाजी मारली. पण आता पहिल्यांदाच मराठवाड्यात भाजपचे कमळ चिन्ह आणि उमेदवाराशिवाय ही निवडणूक लढली जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT