Raosaheb Danve-Eknath Shinde News Jalna
Raosaheb Danve-Eknath Shinde News Jalna Sarkarnama
मराठवाडा

Marathwada : शिंदे गटाचे नाही, तर काँग्रेस- राष्ट्रवादी- उद्धवसेनेचे आमदार फुटणार...

सरकारनामा ब्युरो

जालना : राज्यात सातत्याने उद्धव सेनेकडून शिंदे गटातील आमदार नाराज असल्याच्या वावड्या उठवल्या जातात. प्रत्यक्षात मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव सेनेचे आमदारच फुटण्याची अधिक शक्यता असल्याचा दावा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. जालना येथे प्रसार माध्यमांशी बोलताना रावसाहेब दानवे यांनी विविध प्रश्नांवर दिलखुलास उत्तरे दिली.

आदित्य ठाकरे यांनी आपले वय पाहून बोलावे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून शिंदे गटातील २२ आमदार नाराज असल्याचा दावा काही दिवसांपासून केला जातोय. यासंदर्भात रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना विचारले असता ते म्हणाले, राज्यातील शिंदे सरकार हे भाजपच्या भक्कम पाठिंब्यावर उभे आहे.(Marathwada)

पुढील दोन वर्ष आणि येणाऱ्या पाच वर्षात आम्हाला एकत्रितपणे राज्याचा विकास करायचा आहे. त्यामुळे शिंदे गटात कोणी नाराज असण्याचे कारण नाही, उलट उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचेच आमदार फूटण्याची अधिक शक्यता आहे. ती फुटू नये यासाठीच विरोधकांकडून शिंदे गटाचे आमदार फुटण्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत.

जालन्यात माझे आणि अर्जुन खोतकर यांच्यात आता कोणतेही मतभेद नाहीत, ते मिटले आहेत हे आम्ही दोघांनीही जाहीर केले आहे. तुम्ही आमच्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करू नका, असा टोला देखील दानवे यांनी लगावला. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात असे विधान केले, यावर कोणी मुख्यमंत्री, पंतप्रधान व्हावे हे माझ्या किंवा इतर कुणाच्या बोलण्याने ठरत नसते हा सगळा खेळ संख्याबळाचा आहे.

केंद्रात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील संख्याबळाच्या बळावरच पंतप्रधान झाले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपने भक्कम पाठिंबा दिला म्हणून ते मुख्यमंत्री झाले. त्यामुळे ज्याच्याकडे संख्याबळ असेल त्या पक्षाचा मुख्यमंत्री होत असतो असा टोला लगावत त्यांनी अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याबाबतचे विधान फेटाळून लावले.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या भारत जोडो यात्रेचे येत्या आठवडाभरात महाराष्ट्रात आगमन होणार आहे. यावर तुमचे मत काय असा प्रश्न विचारला असता काॅंग्रेस आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ही यात्रा काढत असल्याचे दानवे म्हणाले. असा चिमटा ही त्यांनी काढला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT