Mla Santosh Danve With Shivam-Adityavardhan News
Mla Santosh Danve With Shivam-Adityavardhan News Sarkarnama
मराठवाडा

Marathwada Politics : असाही योगायोग : दानवे अन् त्यांचे दोन भाचेही विधान भवनात..

सरकारनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar : शुक्रवारी विधानभवनात एक योगायोग जुळून आला. आता हा खरच निव्वळ योगायोग होता की मग यामागे काही भविष्यातील रणनिती हे येत्या काळात स्पष्ट होईल. तर तो योगायोग म्हणजे सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तुटून पडले आहेत. अशावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी शुक्रवारी विधीमंडळात हजेरी लावली.

जाफ्राबाद-भोकरदनचे भाजप आमदार संतोष दानवे (Santosh Danve) यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थीत राहणे तर अनिवार्यच होते. पण ते शुक्रवारी आले, तेव्हा एकटे आले नाही, तर आपले भाचे, रावसाहेबांचे नातू शिवम पांडे यांना सोबत घेवून आले. (Budget Session) मामा-भाच्याची विधानभवनात एन्ट्री होताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. तर दुसरीकडे दानवेंचे दुसरे नातू आदित्यवर्धन हे देखील आपले वडिल माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत विधानभवनात आले होते.

आता हे सगळे एकमेकांच्या समोरासमोर आले की नाही हे कळाले नसले तरी एकाच दिवशी आजोबा, मामा आणि मावस भाऊ एकत्र आल्याचे चित्र पहायला मिळाले. शिवम पांडे हे रावसाहेब दानवे यांच्या कन्या तथा जिल्हा परिषद सदस्य आशा पांडे यांचे चिरंजीव आहेत. तर आदित्यवर्धन हे संजना यांचे पुत्र. दोघेही सध्या शिक्षण घेत आहेत. पण दोघांनाही राजकीय वारसा लाभला आहे.

शिवम पांडे यांना आजोबा रावसाहेब दानवे, मामा आमदार संतोष दानवे यांच्याकडून तर आदित्यवर्धन यांना आजोळी आणि घरातून देखील राजकीय वारसा लाभला आहे. आदित्यवर्धन यांचे आजोबा माजी आमदार स्व. रायभान जाधव, आजी माजी आमदार तेजस्वीनी जाधव, वडिल माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याकडून राजकीय वारसा लाभला आहे.

आदित्यवर्धन याचे सध्या शिक्षण सुरू आहे, शिवाय आमदार होण्यासाठी त्याला आणखी सहा वर्ष वाट पहावी लागणार आहे. राजकारणात घराणेशाहीची परंपरा नवी नाही. त्यावर समाजातून टीका होते, पण ही घराणेशाही पुढे सुरू ठेवण्यात समाजाचा देखील हातभार लागलेला असतो. त्यामुळे पुढच्या काळात दानवेंचे हे दोन्ही नातू विधीमंडळाच्या सभागृहात दिसले तर नवल वाटायला नको.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT