Swarati University, Nanded News
Swarati University, Nanded News Sarkarnama
मराठवाडा

Marathwada : `स्वाराती` विद्यापीठ सिनेट निवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी..

सरकारनामा ब्युरो

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर सिनेट निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलची सरशी झाली आहे. १० पैकी तब्बल ९ जागा जिंकत या पॅनलने वर्चस्व मिळवले आहे. आघाडीच्या ज्ञानतीर्थ पॅनलचे ९ उमेदवार विजयी झाले आहेत, तर विरोधी पॅनलला फक्त एकच जागा जिंकता आली आहे.

दुसऱ्या टप्प्यातील पदवीधर अधिसभा सिनेट निवडणुकांचा निकाल आज घोषित करण्यात आला. त्यानूसार ज्ञानतीर्थ पॅनलचे १० पैकी ९ उमेदवार निवडून आले आहेत. (Nanded) विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. उद्धव भोसले यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक निर्वाचन अधिकारी डॉ. सर्जेराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया शांतते पार पडली. (Mahavikas Aghadi)

स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या पदवीधर निवडणुकीत दहा जागांसाठी विविध पॅनलचे एकूण ४१ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये खुला प्रवर्ग पाच, अनुसूचित जाती एक, अनुसूचित जमाती एक, भटक्या विमुक्त महिला एक आणि ओबीसी एक या जागांसाठी १३ नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते.

महाविकास आघाडी पुरस्कृत ज्ञानतीर्थ पॅनल, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यापीठ विकास मंच त्यासोबतच विद्यापीठ महाविकास आघाडी, संभाजी ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडी यांचेही उमेदवार निवडणुकीत उभे होते. आज पहाटेच्या सुमारास संपूर्ण निकाल घोषित झाला.

यामध्ये खुला प्रवर्ग नारायण चौधरी, पतंगे विक्रम, पाटील युवराज ,माने विनोद ,मगर महेश. ओबीसी - हनमंत कंधारकर, महिला - शितल सोनटक्के, अनुसूचित जाती - बंटी अजय गायकवाड , अनुसूचित जमाती - बालाजी रेजीतवाड व भटक्या विमुक्त - गजानन आसोलकर हे विजयी झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT