Ncp : मराठवाडा शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काॅंग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांच्या विरोधात बंडखोरी करणे प्रदीप सोळुंके यांना चांगलेच महागात पडले. (Teacher)आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सूचना देवून देखील सोळुंके यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे पक्षशिस्त मोडल्याचा ठपका ठेवत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे (Ncp) प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी या संदर्भातील पत्र काढले असून सोळुंके यांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी करण्यात आल्याचे जाहीर केले. राज्यभरात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडत असतांना (Aurangabad) औरंगाबादेत देखील राष्ट्रवादीत बंडखोरी झाल्याचे पहायला मिळाले. आता सोळुंके यांच्या उमेदवारीचा आघाडीच्या विक्रम काळे यांना किती फटका बसतो? हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल.
विक्रम काळे यांना उमेदवारी देण्याचा पक्षात विचार सुरू असतांनाच प्रदीप सोळुंके यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पत्र पाठवत उमेदवारीवर दावा सांगितला होता. नेत्याच्याच मुलाला किती दिवस मोठं करायचं, आता भाकरी फिरवली पाहिजे. काळे यांच्या विरोधात शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी आहे, त्यामुळे यावेळी मला उमेदवारी द्या, अशी मागणी सोळुंके यांनी केली होती. मला द्यायची नसेल तर इतर कुणाला उमेदवारी द्या, पण काळेंना नको, अशी भूमिका सोळुंके यांनी घेतली होती.
एवढेच नाही, तर अजित पवार यांच्या उपस्थितीत विक्रम काळे यांचा अर्ज दाखल केल्यानंतर देखील सोळुंके यांनी आपला अर्ज भरला होता. अजित पवारांनी सोळुंके यांना माघार घेण्याचे आवाहन करत ते वरिष्ठांच ऐकतील, असा विश्वास व्यक्त केला होता. परंतु आज माघारीच्या दिवशी सोळुंके यांनी आणखी आक्रमक भूमिका घेत काळे यांना पक्षाची इज्जत वाचवायची असेल तर माघार घ्या, आणि मला पाठिंबा जाहीर करा, असे आवाहन केले होते.
त्यानंतर ते नाॅटरिचेबल झाले, अखेर त्यांनी माघार न घेता आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला. त्यानंतर माझ्या सारख्या सच्चा कार्यकर्त्यावर पक्ष कारवाईच करू शकत नाही, असा दावा सोळुंके यांनी माध्यमांशी बोलतांना केला होता. पण या दाव्याच्या काही मिनिटातच त्यांच्या हकालपट्टीचे आदेश आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.