Marathwada Water Issue News Sarkarnama
मराठवाडा

Marathwada Water Issue : मराठवाडा पाणीप्रश्नावर मविआ-शिंदे सेना साथ साथ ; तर भाजपची बघ्याची भूमिका...

Jagdish Pansare

Marathwada Political News : नगर-नाशिक या वरच्या भागातील धरणातून जायकवाडी धरणात हक्काचे साडेआठ टीएमसी पाणी सोडा, या मागणीसाठी लोकप्रतिनिधी आक्रमक झाल्याचे दिसून आले. (Marathwada Water Issue) धरणे आंदोलन, रास्ता रोकोच्या माध्यमातून महाविकास आघाडी आणि महायुतीतील सत्ताधारी भाजप वगळता सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरले होते. जायकवाडीच्या हक्काचे पाणी अडवाल तर मुंडक्यावर बसू,अशी आक्रमक भाषा सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केली.

पाणी अडवले तर नगरकडून शहरात येणारे दूध येऊ देणार नाही, असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी दिला. माजी मंत्री राजेश टोपे, अर्जुन खोतकर, माजी मंत्री अनिल पटेल, माजी आमदार कल्याण काळे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. टोपे, शिरसाट या वेळी पहिल्यांदा पाणीप्रश्नावर एवढे आक्रमक झाल्याचे दिसून आले. दुसरीकडे (BJP) भाजपच्या नेत्यांनी मात्र या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.

आमदार हरिभाऊ बागडे आले, पण सरकारने पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे आंदोलनाची गरज नाही हे सांगायला. पण त्यांच्याकडे फारसे कोणी लक्ष दिले नाही, त्यामुळे तेही निघून गेले. (Marathwada) मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार जायकवाडी धरणात साडेआठ टीएमसी पाणी नगर-नाशिकच्या धरणातून सोडणे अपेक्षित होते. (Water Relase) पण तुमच्याकडचे बियरचे कारखाने बंद करा, असे म्हणत नगर-नाशिकच्या लोकप्रतिनिधींनी पाणी सोडण्यास विरोध केला.

त्यामुळे मराठवाडा गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यालयासमोर आज रास्ता रोको करण्यात आला. जायकवाडीत पाणी सोडले नाही, तर मराठवाड्याती एकाही आमदाराने येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होऊ नये, असे आवाहन संजय शिरसाट यांनी या वेळी केले. सकाळी अकरा वाजता सुरू झालेले हे आंदोलन दुपारी चार वाजेपर्यंत सुरू होते. अखेर वाहतुक कोंडी फोडण्यासाठी पोलिसांनी राजेश टोपे यांच्यासह ५० आंदोलकांना ताब्यात घेतले. या सर्वांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

भाजपने मात्र या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी कधीकाळी मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील धरणे कॅप्सूल बाॅम्बने उडवून दिली पाहिजे, अशी आक्रमक भूमिका घेतली होती. पाणी परिषदांच्या माध्यमातून पाणीप्रश्नावर त्यांनी मराठवाड्यातील सर्वपक्षीय आमदारांची एकजूट करण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र, आज प्रत्यक्षात हक्काच्या पाण्यासाठी आंदोलन सुरू असताना ते गायब होते. पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे वजनदार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विरोध दर्शवला आहे. त्यामुळेच भाजपच्या लोकप्रतिनिधींनी या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याची चर्चा यानिमित्ताने होत आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT