Sport University News : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २४ व्या क्रिडा महोत्सवाला कालपासून सुरूवात झाली. Aurangabad या महोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध हाॅकीपटून धनराज पिल्ले आणि राज्याचे क्रिडा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी मराठवाडा क्रिडा विद्यापीठ परत द्या, अशी मागणी केली.
राज्यात युतीचे सरकार असतांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद येथे मराठवाडा क्रिडा विद्यापीठ (Marathwada) स्थापन्यास मंजुरी दिली होती. पण २०१९ मध्ये सत्तेवर आलेल्या शिवसेना- राष्ट्रवादी व काॅंग्रेस महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) सरकारने फडणवीसांचा निर्णय रद्द करत हे क्रिडा विद्यापीठ पुणे येथील बालेवाडी येथे करण्याचा निर्णय घेतला.
आघाडी सरकारच्या या निर्णयाला विरोध झाला, तेव्हा जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या सुभाष देसाई यांनी विधानसभेच्या सभागृहात औरंगाबादला देखील एक क्रिडा विद्यापीठ होणार असल्याची घोषणा केली होती. परंतु ही घोषणा म्हणजे खोटे आश्वासनच ठरले. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील मराठवाडा क्रिडा विद्यापीठ औरंगाबादलाच झाले पाहिजे, अशी आग्रही मागणी करत आंदोलन केले होते.
परंतु महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षामध्ये क्रिडा विद्यापीठ पुण्यातच करण्यावर अधिक भर दिला गेला. यावर पुणे येथे पायाभूतसुविधांवर प्रचंड खर्च झालेला आहे, तिथे क्रिडा विद्यापीठ तयार करण्यासाठीचे इन्फ्रास्ट्रकचर असल्याने औरंगाबादेत अतिरिक्त खर्च कशासाठी? असा प्रश्न उपस्थितीत केला गेला होता. त्यामुळे क्रीडा विद्यापीठ बालेवाडीलाच करण्यावर सरकारचा भर होता.
कालांतराने औरंगाबादेत क्रिडा विद्यापीठ व्हावे ही मागणी देखील मागे पडली. परंतु अडीच वर्षानंतर राज्यात सत्तातंर होऊन आता पुन्हा शिंदे-फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आले आहे. क्रीडा खात्याचे मंत्रीपद देखील भाजपकडेच आहे. त्यामुळे डाॅ. कराड यांनी मराठवाडा क्रिडा विद्यापीठाच्या विषयाला पुन्हा हात घातला आहे.
गिरीश महाजन यांनी देखील या संदर्भात आपण उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करू, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने पळवलेले मराठवाड्याचे क्रिडा विद्यापीठ शिंदे-फडणवीस सरकार परत करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.