Opposistion Leader Ambadas Danve News, Aurangabad
Opposistion Leader Ambadas Danve News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Marathwada : तुम्ही मदत जाहीर करा, आम्ही दौरे बंद करतो; उद्धवसेनेचे सरकारला आव्हान..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरले आहेत. हा काही राजकीय दौरा नाही, तर अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना धीर, दिलासा आणि मदत मिळवून देण्यासाठीचा दौरा आहे. तो कागदावर किती मिनिटांचा आहे, याला काही महत्व नाही. दौऱ्यावर टीका करणाऱ्या सरकाने मदत जाहीर करावी, आम्ही दौरे बंद करतो, असे आव्हान विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिले आहे.

राज्यातील सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पहिल्यांदाच मुंबई बाहेर औरंगाबाद दौऱ्यावर आले. त्यांच्या या दौऱ्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह असला तरी शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री आणि भाजपचे नेते मात्र याला नौटंकी व राजकीय दौरा म्हणून टीका करत आहेत. (Aurangabad) या टीकेला अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

राज्यातील शेतकरी संकटात आहे, अतिवृष्टी, सततचा पाऊस, परतीचा पाऊस, कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ अशा चक्रात तो अडकला आहे. त्यामुळे वर्षभर त्याच्यावर सातत्याने संकट येत आहेत. अशावेळी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याऐवजी त्यांना आधार देण्याची गरज असते. सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करतआहे.

उद्धव ठाकरे यांचा दौरा मात्र शेतकऱ्यांना धीर आणि दिलासा देण्यासाठीचा आहे. सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या टीकेला आम्ही महत्व देत नाही. ऐन दिवाळीत शेतकरी अडचणीत आहे, त्याला सण साजरा करता येत नाही, सरकारने मात्र पंचनाम्याचे कागदी घोडे नाचवणे सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय, मदत मिळवून देण्यासाठी उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरले आहेत आणि त्यासाठीचा हा दौरा आहे.

राज्य सरकारने मदत जाहीर केली तर आम्हाला दौरे करण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे दौऱ्यावर टीका किवा त्याला राजकीय म्हणण्यापेक्षा सरकारने मदत जाहीर करावी, आम्ही दौरे बंद करू, अशा शब्दात दानवे यांनी सरकारला आव्हान दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT