Market Committee, News Marathwada Sarkarnama
मराठवाडा

Market Committee News : मराठवाड्यातील ५९ बाजार समित्यांसाठी आघाडी विरुद्ध सत्ताधारी सामना रंगणार..

Maharashtra : अशोक चव्हाण, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, मंत्री तानाजी सावंत, संदीपान भुमरे, अमित देशमुख या नेत्यांचा देखील कस लागणार आहे.

सरकारनामा ब्युरो

Marathwada : कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती (Market Committee )निवडणुकीला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. राज्यातील सत्तांतर नाट्य, नुकत्याच झालेल्या ग्रामपंचयात आणि त्यानंतर झालेल्या विधान परिषद, विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील निकाल पाहता पुन्हा एका महाविकास आघाडी विरुद्ध सत्ताधारी शिंदे-भाजप सरकार यांच्यात सामना रंगणार आहे.

केंद्र आणि राज्यातील अर्थसंकल्पात शेतकरी आणि शेत मालाला योग्य भाव हा मुद्दा केंद्रस्थानी राहिला होता. दोन्ही अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी भरपूर तरतुदी केल्याची आकडेवारी मांडण्यात आली आहे. (Mahavikas Aghadi) प्रत्यक्षात याचा लाभ शेतकऱ्यांना किती होतो याबद्दल कायम साशंकता असते. (Bjp) या पार्श्वभूमीवर होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.

विधान परिषद, पोटनिवडणुकीतील मतदानातून सत्ताधारी पक्षांच्या विरोधात नाराजी दिसून आली असली तरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मतदार, सोसायट्या, शेतकरी सभासद यांचा कल नेमका काय आणि कुणाच्या बाजूने असेल? हे या निवडणुकांच्या निकालावरून स्पष्ट होणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सत्ता प्रत्येक राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांसाठी आगामी जिल्हा परिषद, महापालिका तसेच विधानसभा, लोकसभा निवडणुकांसाठी देखील महत्वाच्या ठरत असतात.

त्यामुळे सत्ताधारी भाजप, शिवसेना (शिंदे गट) उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना व काॅंग्रेस-राष्ट्रवादी हे सगळेच पक्ष बाजार समितीसाठी जोर लावणार आहेत. मराठवाड्यात एकूण ५९ बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निमित्ताने अशोक चव्हाण, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, मंत्री तानाजी सावंत, संदीपान भुमरे, अमित देशमुख या नेत्यांचा देखील कस लागणार आहे.आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून बाजार समित्यांच्या निवडणुकांकडे बघितले जाते. त्यामुळे मराठवाड्यातील सर्वच पक्षाच्या नेते, लोकप्रतिनिधींनी या निवडणुकांमध्ये लक्ष घातले आहे.

येत्या २८ एप्रिल रोजी मतदान होणाऱ्या या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पॅनल, त्यातील उमेदवार एवढेच नाही, तर सभापती, उपसभापती पदावर कोणाला बसवायचे याची देखील मोर्चेबांधणी प्रत्येक जिल्हा, तालुका पातळीवर सुरू झाली आहे. बैठका, मेळाव्याच्या माध्यमातून प्रचार यंत्रणेला देखील वेग आल्याचे चित्र सर्वत्र आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७, बीड - ९,लातूर- १०, जालना- ५, परभणी - ११, धाराशीव - ८, नांदेड - ५ तर हिंगोली जिल्ह्यातील ४ अशा एकूण ५९ बाजार समित्यांसाठी मतदान होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT