Dr. Bhagwat Karad News  Sarkarnama
मराठवाडा

Dr.Bhagwat karad News : बैठकांवर बैठका, पण पाणीपुरवठा योजनेचे काम कासवगतीनेच..

सरकारनामा ब्युरो

Marathwada News : येणाऱ्या लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीत शहरातील पाण्याचा प्रश्न सर्वच राजकीय पक्षांची डोकेदुखी ठरणार आहे. (Dr.Bhagwat karad News) त्यामुळे हा प्रश्न निकाली लावून त्याचे श्रेय घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड शहरातील पाणीपुरवठा योजनेचा सातत्याने आढावा घेत आहेत.

प्रत्यक्ष जायकवाडीपासून शहरातील पाण्याच्या टाक्यांचे सुरू असलेले काम याची पाहणी देखील करत आहेत. (Aurangabad) वारंवार बैठका, आढावा घेवून देखील कामाला गती मिळत नसल्याने कराड चांगलेच वैतागले आहेत. (Water Supply) गेल्या बैठकीत त्यांनी कंत्राटदारावर कारवाई करण्याच्या सूचना देखील दिल्या होत्या. मात्र याचा फारसा उपयोग झालेला नाही.

लोकसभा निवडणुक वर्षभरावर त विधानसभेची दीड वर्षांवर आली आहे. परंतु पाणीपुरवठा योजनेचे काम अद्यापही ६५ टक्के शिल्लक आहे. (Dr.Bhagwat Karad) २०२४ पर्यंत शहरवासियांना २४ तास पाणी मिळेल, असा दावा कराड यांनी यापुर्वी केला होता. प्रत्यक्षात कामाची कासवगती पाहता आणखी दीड ते दोन वर्ष मुबलक पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे आजच्या आढावा बैठकीतून स्पष्ट झाले आहे.

दोन वर्षात केवळ ३५ टक्के काम पूर्ण झाले असून, डिसेंबर २०२४ पर्यंत योजना पूर्ण करायची झाल्यास उर्वरित दीड वर्षात तब्बल ६५ टक्के काम करावे लागणार आहे. शहराच्या २,७४० कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा कराड वारंवार आढावा घेत आहेत. सोमवारी स्मार्ट सिटी कार्यालयात त्यांनी आढावा घेतला. मुख्य जलवाहिनीचे ३६ पैकी १९ किमीपर्यंत काम झाले आहे. सध्या पाईप जोडणीच्या कामावर असलेले प्रशिक्षित कामगार गावी निघून गेल्याने हे कामदेखील रखडले आहे.

तसेच ११ जलकुंभाचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल, असे यावेळी सांगण्यात आले. प्राधान्यक्रमाने ठरवून दिलेल्या ११ जलकुंभांची कामे डिसेंबरमध्ये पूर्ण झाल्यानंतर साठवण क्षमता वाढणार असल्याचे सांगताच डॉ. कराड यांनी डिसेंबरनंतर आपण दोन दिवसाआड पाणी देऊ शकतो का? असा प्रश्‍न केला. डिसेंबरनंतर दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे आदेश डॉ. कराड यांनी यावेळी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT