Guardian Minister Meghna Bordikar  Sarkarnama
मराठवाडा

Meghana Bordikar News: '...ही महिलांची संधी काँग्रेस अन् इंडिया आघाडीतील पक्षांनी हिरावून घेतली!'; मेघना बोर्डीकरांचा गंभीर आरोप

Parbhani BJP News: विरोधी पक्षांनी नारीशक्ती विधेयकाला विरोध केल्याने दिल्ली, मुंबईसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात महिलांचा आक्रोश समोर येत आहे. परभणी जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने लवकरच महिला आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Jagdish Pansare

Parbhani BJP News : काँग्रेसनं नेहमीप्रमाणे महिलांच्या प्रगतीला अडथळा निर्माण करण्याचे काम केले आहे. महिलांचा सन्मान आणि अधिकारांसाठी उभे राहणाऱ्या धोरणांना पाठिंबा देणे आणि महिला विरोधी विचारसरणीला मतदानातून योग्य उत्तर देणे ही काळाची गरज आहे. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे महिला विरोधी असल्याचे उघड झाले आहे.

परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी हे पक्ष पुरोगामी असल्याचे सांगतात, फुले- शाहू आंबेडकर यांच्या नावाचा केवळ वापर करतात, असा आरोप केला. नारीशक्ती विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेससह इंडिया आघाडीचा खरा चेहरा या निमित्ताने उघड झाला आहे. काँग्रेसने नारीशक्ती विधेयकाला केलेल्या विरोधाचा निषेध म्हणून लवकरच परभणीत भाजपाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढणार असल्याचेही बोर्डीकर यांनी जाहीर केले.

काँग्रेस पक्षाने नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध करून आपला महिला विरोधी दृष्टिकोन पुन्हा एकदा स्पष्ट केला आहे. या विधेयकामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण मिळणार होते. त्यामुळे संसद आणि विधानसभेत महिलांचे प्रतिनिधित्व वाढवून त्यांना निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी मिळणार होती.

मात्र, काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील पक्षांनी ही संधी हिरावून घेतली असा, आरोप मेघना बोर्डीकर यांनी केला. महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकार कायमच प्रयत्नशील असते. त्यासाठीच नारीशक्ती वंदन विधेयक संसदेत मांडण्यात आले. परंतु काँग्रेसने नेहमीप्रमाणे महिलांच्या प्रगतीला अडथळा निर्माण करण्याचे काम केले. महिलांचा सन्मान आणि अधिकारांसाठी उभे राहणाऱ्या धोरणांना पाठिंबा देणे आणि महिला विरोधी विचारसरणीला मतदानातून योग्य उत्तर देणे ही काळाची गरज असल्याचे बोर्डीकर म्हणाल्या.

काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे महिला विरोधी असल्याचे या निमित्ताने उघड झाले आहे. हे पक्ष पुरोगामी असल्याचे सांगतात, फुले- शाहू-आंबेडकर यांच्या नावाचा केवळ वापर करतात. विरोधी पक्षांनी नारीशक्ती विधेयकाला विरोध केल्याने दिल्ली, मुंबईसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात महिलांचा आक्रोश समोर येत आहे. परभणी जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने लवकरच महिला आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ,अहिल्यादेवी होळकर आदींनी तत्कालीन परिस्थितीत सक्षम नेतृत्व केले. महिला आजही विविध क्षेत्रात नेतृत्व सिद्ध करत आहेत, अशा वेळी विरोधकांनी घेतलेली महिला विरोधी भूमिका स्वीकारार्ह नाही, विरोधकांच्या या भूमिकेचा आम्ही निषेध करतो, असेही मेघना बोर्डीकर म्हणाल्या

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT