Chitra Wagh | Mehboob Shaikh
Chitra Wagh | Mehboob Shaikh Sarkarnama
मराठवाडा

मेहबूब शेख प्रकरणाला नवे वळण; चित्रा वाघांविरोधात आणखी एका पिडीतेचा गौप्यस्फोट

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mehboob Shaikh) यांच्यावरील बलात्कार आरोप प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील तक्रारदार तरुणीने मोठा गौप्यस्फोट केला आहे. २ तरुण, भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि सुरेश धस (Suresh Dhas) यांनी आपल्याला शेख यांच्याविरोधात तक्रार द्यायला भाग पाडले अशी तक्रार या तरुणीने दिली आहे. औरंगाबादच्या जिन्सी पोलिस ठाण्यात या प्रकरणी विशाल खिल्लारी आणि नदीमुद्दीन शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Mehabub Shaikh Rape Case Latest News)

महेबूब शेख यांच्याविरुद्ध औरंगाबाद येथील बायजीपुरा भागात राहणाऱ्या २९ वर्षीय उच्चशिक्षित तरुणीने बलात्काराची तक्रार दाखल केली होती. या पिडीतेच्या तक्रारीवरुन डिसेंबर २०२० मध्ये औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोकरीचे आमिष दाखवून मुंबईला नेण्यासाठी म्हणून १४ नोव्हेंबर २०२० रोजी रात्री शेख यांनी कारमध्ये आपल्यावर अत्याचार केला असा आरोप या तरुणीने केला होता. आपण प्रतिकार केला. मात्र, तोंड दाबून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तिने तक्रारीत म्हटले होते.

दरम्यान या तरुणीने आता घुमजाव करत आपल्याला असे काही करायचे नव्हते मात्र २ तरुण, भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि सुरेश धस (Suresh Dhas) यांनी आपल्याला शेख यांच्याविरोधात तक्रार द्यायला भाग पाडले असा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

सुरेश धस आणि चित्रा वाघ यांच्याविरोधात पिडीतेची तक्रार

संबंधित तरुणीने दिलेल्या तक्रारीमध्ये, मला असे काही करायचे नव्हते. मात्र विशाल खिल्लारी आणि नदीमुद्दीन शेख यांनी हे प्रकरण घडवून आणले, असे म्हटले आहे. ही तक्रार करायला लावण्यापूर्वी या दोघांनी आपल्यावर अत्याचार केले, आणि त्याचे व्हिडीओ तयार करुन ते समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी दिली.

पुढे चित्रा वाघ आणि सुरेश धस आपल्याला मुंबईत भेटले आणि त्यांनी तुला हे करावे लागले अन्यथा तु संकटात येशील, असे म्हणतं मेहबूब शेख यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी दबाव वाढवला. असेही या तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय काही लोकांना आणि पोलिसांनाही या प्रकरणात मोठी रक्कम दिली असल्याचा दावाही या तक्रारीत करण्यात आला आहे. दरम्यान यापूर्वी पुण्यातील शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्या प्रकरणातील तरुणीनेही चित्रा वाघ यांच्याविरोधात दबाव टाकून तक्रार करायला लावला असल्याचा आरोप केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT