Beed Political News : राष्ट्रवादीतील बंडानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार आज पहिल्यांदाच बीडमध्ये आले. (Ajit Pawar In Beed News) परभणी येथील कार्यक्रम आटोपून बीडमध्ये येताच त्यांनी शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. मेटे यांचे राज्याच्या राजकारणात वेगळे स्थान होते.
मराठा आरक्षण, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक यासह अनेक महत्वाच्या विषयावर मेटे (Vinayak Mete) यांची भूमिका महत्वाची मानली गेली. मराठा आरक्षण विषयावरील बैठकीसाठी मुंबईला जात असतांनाच त्यांच्या कारला अपघात झाला आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू. मेटे यांच्या दुर्दैवी मृत्यूने सर्वच हळहळले होते.
आज बीडमध्ये दाखल होताच (Ajit Pawar) अजित पवार यांनी देखील विनायक मेटे यांच्या कार्याची आठवण ठेवत त्यांच्या समाधीला अभिवादन केले. (Beed News) यावेळी त्यांच्यासोब कृषी मंत्री धनंजय मुंडेही होते. विनायक मेटे यांचे गेल्या वर्षी मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या बैठकीला जाताना मुंबईजवळ अपघाती निधन झाले.
दरम्यान, मेटे यांनी त्यांचा महाराष्ट्र लोकविकास पार्टी हा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलिन केला होता. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही मेटे यांनी अजित पवारांसोबत काम केलेले आहे. मेटे यांचे सगळ्याच राजकीय पक्षातील नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. रविवारी बीडला सभेसाठी येताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा जालना रोड भागात असलेल्या मेटे यांच्या स्मृतिस्थळाकडे गेला. त्यांच्या समाधीला फुल अर्पण करत अजित पवारांनी मेटेंना अभिवादन केले.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.