Jayant Patil, NCP
Jayant Patil, NCP Sarkarnama
मराठवाडा

...म्हणून एमआयएमच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; जयंत पाटलांनी सांगितले कारण

सरकारनामा ब्यूरो

लातूर : मुस्लिम मतांमध्ये विभाजन व्हावे यासाठी भाजप (MIM) ला ताकद देत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला आहे. लातूर मधील एमआयएम कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी पाटील बोलत होते.

पाटील म्हणाले, अल्पसंख्याक समाजाचे मान्यवर नेते भावनेच्या भरात एमआयएममध्ये गेले होते. मात्र, आता या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले आहे की भाजप, एमआयएमचा उपयोग मत विभाजनासाठी आहे. हे सर्व अल्पसंख्याक समाजाला कळाले आहे. त्यातही मुस्लीम समाजाला हे चांगल्या प्रकारे कळाले आहे. आधी केलेली चूक नंतर होवू नये यासाठी एमआयएमचे कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. असे पाटील यांनी सांगितले.

पाटील यांच्या वक्तव्यामुळे आता राजकीय चर्चांना चांगलच उधान आले आहे. भाजप आमदार राम कदम यांनी हे वक्तव्य म्हणजे राजकीय हेतून प्रेरीत, असल्याचा आरोप कदम यांनी केला आहे. तसेच लोकांना भ्रमीत करण्याचा प्रयत्न असल्याचही ते म्हणाले. भाजप आणि एमआयएमच्या विचारसरणीत जमीन आसमानाचा फरक असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणेंचे उजवे हात शिवसेना जिल्हाप्रमुख (मावळ) गजानन चिंचवडे यांनी गेल्या महिन्यात २२ तारखेला शिवबंधन तोडून कमळ हाती घेतले. त्यानंतर तीन आठवड्यांतच शिवसेना आणि बारणे यांना पिंपरी चिंचवड शहरात दुसरा धक्का बसला आहे. बारणेंचे निकटवर्तीय आणि माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत आज (ता.१४) राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला. पक्ष आपलाच आहे, असे सांगत मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे स्वागत केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT