imtiaz jalel, Pradeep Jaiswal Sarkarnama
मराठवाडा

Chhatrapati Sambhajinagar : लोकसभेला इम्तियाज जलील यांना लीड, आमदार प्रदीप जयस्वाल डेंजर झोनमध्ये...

imtiaz jalel leads Lok Sabha MLA Pradeep Jaiswal in danger zone : संभाजीनगरमधील विजयाने महायुतीची पत राखली असली तरी जिल्ह्यातील एक मंत्री आणि सत्ताधारी एका आमदाराच्या मतदारसंघात विरोधी पक्षाला लीड मिळाल्याने चिंतेचे वातावरण आहे.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील आठ पैकी केवळ छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून महायुतीचे संदीपान भुमरे हे विजयी झाले. इतर सातही मतदारसंघात महाविकास आघाडीची सरशी झाली. संभाजीनगरमधील विजयाने महायुतीची पत राखली असली तरी जिल्ह्यातील एक मंत्री आणि सत्ताधारी एका आमदाराच्या मतदारसंघात विरोधी पक्षाला लीड मिळाल्याने चिंतेचे वातावरण आहे.

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर जेव्हा विधानसभानिहाय मतदानाची आकडेवारी समोर आली तेव्हा जिल्ह्यातील सहा पैकी चार विधानसभा मतदारसंघात संदीपान भुमरे आघाडीवर राहिले. एमआयएमचे इम्तियाज जलील, महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे दोघेही या मतदारसंघात अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकावर होते.

परंतु शहरातील संभाजीनगर पुर्व जिथे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आणि मध्ये मतदारंसघात शिवसेनेचे प्रदीप जयस्वाल आमदार आहेत या दोन्ही मतदारसंघात संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) पिछाडीवर होते. शहरातील या दोन्ही महत्वाच्या मतदारसंघात एमआयएमचे इम्तियाज जलील यांना आघाडी मिळाली.

2014 मध्ये शिवसेना-भाजप युती तुटल्याचा फायदा उचलत इम्तियाज जलील याच मध्य मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 2019 ला ते लोकसभा लढले आणि खासदार झाले. यावेळी शिवसेनेने (Shivsena) हा मतदारसंघ पुन्हा आपल्या ताब्यात घेतला आणि प्रदीप जयस्वाल इथून निवडून आले. एमआयएमच्या नासेर सिद्दीकी यांचा त्यांनी पराभव केला होता.

2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने समोर आलेल्या आकडेवारीने विद्यमान आमदार प्रदीप जयस्वाल यांचे खाडकन डोळे उघडावेत, अशी आकडेवारी समोर आली. मध्य मतदारसंघात महायुतीचे संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) यांना 59740 तर एमआयएमच्या इम्तियाज जलील यांना 85937 एवढी मते मिळाली. म्हणजे भुमरे यांच्यापेक्षा इम्तियाज 26 हजाराहून अधिक मतांनी आघाडीवर राहिले.

शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) हे तिसऱ्या क्रमांकावर गेले. ही आकडेवारी दोन्ही शिवसेनेच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरू शकते. प्रदीप जयस्वाल यांच्यासाठी येणारी विधानसभा निवडणूक सोपी असणार नाही, त्यांना मतदारसंघात खूप मेहनत घ्यावी लागणार हे यावरून स्पष्ट झाले आहे. तर शिवसेना ठाकरे गटालाही आत्मचिंतन करायला लावणारी ही बाब आहे.

विधानसभेला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना झाला, तर लोकसभेच्या निवडणुकीत 'एमआयएम'ला मिळालेल्या मतांचा विचार केला तर इथे त्यांचा आमदार निवडून येऊ शकतो अशी परिस्थिती आहे. जयस्वाल यांच्यासाठी डेंजर झोन ठरत असेल्या मध्य मतदारसंघात शिवसेना किती तयारीनिशी मैदानात उतरते यावरच विजयाचे गणित अवलंबून असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT