Mla Ambadas Danve-Mp Imtiaz Jalil, News.
Mla Ambadas Danve-Mp Imtiaz Jalil, News. Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve On Aimim March News : झुंडशाही माजवणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहून राजकीय पोळी भाजण्याचा एमआयएमचा प्रयत्न...

सरकारनामा ब्युरो

Shivsena : कन्नड तालुक्यातील शेलगांव दंगल प्रकरणानंतर एका मुस्लिम महिलेला पोलिसांकडून अमानुष मारहाण झाल्याचा आरोप एमआयएमने केला आहे. (Mla Ambadas Danve-Mp Imtiaz Jalil, News.) खासदार इम्तियाज जलील उद्या, (ता.६) मंगळवारी कन्नडमध्ये पोलिसांच्या विरोधात मोर्चा काढणार आहे. यावरून आता राजकीय वातावरण तापले असून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी एमआयएम झुंडशाही करणाऱ्यांचे समर्थन करत असल्याचा आरोप केला आहे.

या निमित्ताने आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांचा हा प्रयत्न असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे. (Aimim) इम्तियाज जलील यांनी महिलेला पोलिसांकडून झालेल्या मारहाणीचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल केले होते. त्यानंतर या प्रकरणाची दुसरी बाजू अंबादास दानवे यांनी ट्विटच्या माध्यमातून समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.

शेलगांव येथे दोन समुदायामंध्ये झालेल्या दंगलीत एका समुदायाच्या जमावाने पोलिसांवर हात उचलल्याचा दावा दानवे यांनी केला आहे. (Shivsena) या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये दानवे म्हणाले, महाराष्ट्र सरकार कायद्याचे समर्थन करणारे आहे की झुंडशाहीचे? पोलिसांवर उचललेले हात न पाहता, आपली राजकीय पोळी भाजून झुंडशाही माजवणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे सरकारला पसंत आहे का?

विशेष करून छत्रपती संभाजीनगरात? झुंडी रस्त्यावर उतरवण्याची भाषा करून आता शहरातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर आता ते सहन केले जाणार नाही. दानवे यांच्या या इशाऱ्यानंतर राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.

दोन समुदायाच्या महिलांमध्ये झालेल्या भांडणांतून पिशोर पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस निरीक्षक कोमल शिंदे यांच्यासह चार पोलिस कर्मचाऱ्यांनी शबाना पटेल यांना अमानुष मारहाण केल्याचा इम्तियाज यांनी आरोप केला आहे. पोलिसांच्या या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी खासदार इम्तियाज जलील मंगळवारी औरंगाबाद ते कन्नड असा मोर्चा काढणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT