Aurangabad Political News : मराठवाड्यात सुरू असलेल्या मंत्रिमंडळ बैठकीवर विरोधकांकडून मागच्या बैठकीतील घोषणांचे काय झाले? असा सवाल करत टीका केली जात आहे. (Cabinet Meeting News) यावर सत्ताधारी मंत्रीदेखील आक्रमक झाले असून, त्यांनीही या टीकेला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. अजित पवार यांनी विरोधकांना सुनावतानाच आपल्याच सरकारमधील मंत्र्यांचे, पालकमंत्र्यांचेही कान टोचले.
आपल्याला मिळालेली मंत्रिपदं ही खुर्चीवर बसण्यासाठी नाही, तर जनतेची कामे करण्यासाठी आहेत. (Marathwada) मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्याने पाठपुरावा केला पाहिजे, दर आठवड्याला आढावा घेतला पाहिजे, असा सल्लाही अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिला. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. मी सकाळी सातपासून कामाला सुरुवात करतो. लोकांची कामं करायची असतील, तर सकाळी लवकर उठावे लागते.
पिंपरी-चिंचवडमध्ये सकाळी सातला कार्यक्रम असेल तरी लोकं येतात. मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. पण त्या निर्णयांचे पुढे काय होते? याचा पाठपुरावा करण्याचे काम त्या-त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचे असते. (Maharashtra) मराठवाड्याच्या बाबतीत मी सांगू इच्छितो, जे निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत होतात. त्याचे पुढे काय झाले याचा दर आठवड्याला आढावा आठही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी घ्यायला पाहिजे. पाठपुरावा केला तर घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होतेच.
मंत्रिपदे फक्त खुर्चीवर बसण्यासाठी नाहीत, तर जनतेची कामे करण्यासाठी आहेत. रात्री झोपताना दिवसभरात किती कामे केली याचा विचार प्रत्येक मंत्र्यांनी केला पाहिजे, असेही अजित पवार म्हणाले. शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करून उपयोग नाही, तर त्यांच्या नावाला शोभणाऱ्या इमारती शहरात उभ्या राहिल्या पाहिजेत. सुभेदारी विश्रामगृह आता जुने झाले आहे, नवीन विश्रामगृह बांधण्याची गरज आहे. आगामी काळात शतक महोत्सव साजरा करताना प्रत्येकाला हेवा वाटेल असे छत्रपती संभाजीनगर उभे राहिले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.