Dhiraj Deshmukh
Dhiraj Deshmukh Sarkarnama
मराठवाडा

महापालिकेची ग्रामीण भागात बससेवा सुरू, आमदार धीरज देशमुख म्हणाले, भैय्या आभार..

सरकारनामा ब्युरो

लातूर : लातूर महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या लातूर-धनेगाव सिटीबस सेवेचा शुभारंभ आमदार धिरज देशमुख (Mla Dhiraj Deshmukh) यांच्या हस्ते करण्यात आला. लातूर (Latur) ग्रामीणच्या नागरिकांसाठी सुरू झालेली ही पहिलीच बससेवा आहे. (Marathwada) या वेळी तिकीट काढून देशमुख यांनी नागरिकांसोबत प्रवासही केला.

प्रवाशांची मागणी आणि मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन लातूर महापालिकेच्या सिटीबस सेवेचा टप्याटप्याने विस्तार केला जात आहे. त्यानुसार आज लातूर ते (सोनवती, सारोळा मार्गे) धनेगाव या मार्गावर सिटीबस सुरु करण्यात आली.

याचा शुभारंभ करून धिरज देशमुख यांनी ही सेवा तातडीने उपलब्ध करुन दिल्याबद्दल लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख, महापौर, आयुक्त व लातूर महापालिकेचे आभार मानले. ग्रामीण भागातील प्रवाशांची मागणी व त्यांची सोय विचारात घेऊन लातूर महापालिकेने ही सेवा उपलब्ध करुन दिली आहे.

या सुरक्षित, सुलभ सेवेचा शालेय विद्यार्थी, महिला, नोकरदार व सर्वसामान्यांना चांगला लाभ होईल, या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन धीरज देशमुख यानी नागरिकांना केले. ही सुविधा सुरू केल्याबद्दल धनेगाव ग्रामपंचायत व युवक काँग्रेससह सोनवती, सारोळाच्या सरपंचांनी देशमुख यांच्या सत्कार केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT