MLA Kailas Gorantyal News Sarkarnama
मराठवाडा

MLA Kailas Gorantyal News : मेडिकल काॅलेजसाठी सत्तारांकडून बोगस कागदपत्रे, काँग्रेस आमदाराचा खळबळजनक आरोप..

Congress News : जिथे हॉस्पिटलचा अस्तित्वात नाही तिथे विविध विभागाच्या परवानग्या व एनओसी कशाच्या आधारावर घेण्यात आल्या.

Jagdish Pansare

Marathwada Political News : राज्याचे पणन व अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार हे पुन्हा नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे. यावेळी जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. (Congress News) सिल्लोड येथे मेडीकल काॅलेज मंजूर करुन घेण्यासाठी अब्दुल सत्तार यांनी बोगस कागदपत्रे दिली. मेडिकल कौन्सीलची फसवणूक केल्याप्रकरणी सत्तारांची चौकशी करावी आणि त्यांना मंत्रीमंडळातून काढून टाकवे, अशी मागणीही गोरंट्याल यांनी पत्रकार परिषदेत केली.

अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी सिल्लोड येथे मेडीकल कॉलेजची मंजुरी घेण्यासाठी नॅशनल आयुर्वेदिक व नॅशनल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची (अलोपॅथिक) बोगस कागदपत्रे तयार करत आरोग्य विभाग व शासनाची फसवणूक केली. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने मेडीकल कॉलेजच्या परवानगीसाठी एक हजार बेडचे हॉस्पिटल, मोठी इमारत तसेच दोन वर्षे हॉस्पिटल चालविण्याचा अनुभव असा नियम घालून दिलेला आहे. (Kailas Gorantyal) त्यामुळे सत्तार यांनी मेडीकल कॉलेजची परवानगी घेण्यासाठी बोगस कागदपत्र तयार केले.

सत्तारांनी दाखविलेल्या नॅशनल मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल अँड मेडिकलच्या नोंदणीसाठी अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांनी १२ ऑक्टोंबर २०२२ ला अर्ज केला होता. (Congress) जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. डी. एम. मोतीपवळे यांनी तीन एप्रिल २०२३ ला बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ऍक्ट १९४९ अन्वये नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या ३०० बेडच्या हॉस्पिटलला परवानगी दिली. सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश विसपुते यांनी १४ मार्च २०२३ ला आरोग्य विभागाला अहवाल सादर केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यात या इमारती सर्व सोयी सुविधा उपलब्ध असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात तिथे हॉस्पिटल अस्तित्वात नाही, सोयी सुविधा उपलब्ध नाहीत, नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे सचिव अब्दुल समीर यांनी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांची तब्बल ३६ लोकांची यादी शपथपत्राद्वारे सादर केलेली आहे. या यादीतील सर्वच डॉक्टर हे सिल्लोडमध्ये खासगी प्रॅक्टीस करतात तर काहीजण शासकीय सेवेत आहेत, असा आरोप गोरंट्याल यांनी केला.

जिथे हॉस्पिटलचा अस्तित्वात नाही तिथे विविध विभागाच्या परवानग्या व एनओसी कशाच्या आधारावर घेण्यात आल्या, असा सवालही गोरंट्याल यांनी केला. सत्तार यांनी मेडिकल कौन्सिलची फसवणूक केली आहे. त्यामुळे प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, संस्थेची मान्यता रद्द करून संस्थेची सर्व मालमत्ता शासनाकडे जमा करण्यात यावी, अशी मागणी करतानाच मेडिकल कौन्सिलकडे तसेच केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाकडे तक्रार करणार असल्याचे गोरंट्याल यांनी सांगितले.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT