Mla Haribhau Bagde News  Sarkarnama
मराठवाडा

Mla Haribhau Bagde News : फायलींवर सह्या का नाही केल्या ? चार तास बागडे दालनात खुर्ची टाकून बसले..

Bjp : गेल्या वर्षभरापासून शेतकरी सिंचन विहिरीच्या फायली धुळखात पडून आहेत. तर अनेक सापडत नाहीयेत.

नवनाथ इधाटे

Phulambri : भाजप आमदार हरिभाऊ बागडे तसे शांत स्वभावाचे, पण काम झाले नाही, तर ते रुद्रावतार धारण करतात. आज त्यांचा हा रुद्रावतार पहायला मिळाला. (Mla Haribhau Bagde News) गेल्या अनेक दिवसांपासून अधिकाऱ्यांच्या सह्याअभावी रखडलेल्या फायलींवर आक्रमक झालेल्या बागडे यांनी पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात चार तास ठिय्या दिला. आताच्या आता सगळ्या फायलींवर सह्या करा, त्याशिवाय मी इथून हलणार नाही, असा पावित्रा घेत बागडे कार्यालयाच बसून आहेत.

बागडेंचा संताप पाहून अधिकाऱ्यांच्या पाचावर धारण बसली असून रखडलेल्या फायली मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांची आता पळापळ सुरू झाली आहे. (Haribhau Bagde) पंचायत समिती अंतर्गत मागील गेल्या वर्षभरापासून विहिरींच्या फायली संबंधित अधिकाऱ्यांच्या सह्या न झाल्याने रखडल्या आहेत. (Bjp) तर काही फायली या त्रुटी काढून परत पाठवण्यात आल्या होत्या.

हा प्रकार लक्षात येताच आज आमदार हरिभाऊ बागडे यांनी पंचायत समिती गाठत गटविकास अधिकाऱ्यांचे दालन गाठले. `सरकार तुम्हाला जनतेची काम करण्यासाठी पगार देतं, मग तुम्ही फायलींवर सह्या का नाही केल्या? असा जाब गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांना बागडेंनी विचारला. (Marathwada) तसेच जोपर्यंत फायलींवर सह्या होत नाही, तोपर्यंत मी इथून हलणार नाही, अशी भूमिका घेत एक-दोन नव्हे, तर चार तासांपासून बागडे बीडीओंच्या दालनात बसून होते.

भाजपचे अनेक पदाधिकारी देखील त्यांच्यासोबत हजर होते. फुलंब्री पंचायत समितीत मागील गेल्या वर्षभरापासून शेतकरी सिंचन विहिरीच्या फायली धुळखात पडून आहेत. तर अनेक संचिका अधिकाऱ्यांनाही सापडत नाहीयेत. हा प्रकार समजताच संतापलेल्या बागडेंनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची खरडपट्टी काढली. लाभार्थीच्या तक्रारी वाढत असल्याने हरिभाऊ बागडे यांनी थेट पंचायत समिती गाठत शेतकऱ्यांच्या संचिका मंजूर झाल्याशिवाय मी इथून हलणार नाही, असा पावित्रा घेतला.

त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्याने तात्काळ पंचायत समितीत धाव घेतली. बीडीओ न्यायालयीन कामासाठी छत्रपती संभाजीनगर येथे गेल्या होत्या. त्यांना तातडीने फुलंब्रीला बोलावण्यात आले. तीन तासांनी त्या कार्यालयात आल्या, तोपर्यंत बागडे तिथेच बसून होते. परंतु बागडे यांच्या प्रश्नावर त्या सकारात्मक उत्तर देवू शकल्या नाहीत. त्यानंतर बागडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधत संचिका मंजूर झाल्याशिवाय मी उठणार नाही, असे सांगितले. त्यानंतर मात्र पंचायत समितीमधील वातावरण चांगलेच तापले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT