Shivsena UBT News : पाचोरा येथील शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी एका पत्रकारास भ्रमणध्वनीवरून शिवीगाळ केल्याचे प्रकरण समोर आले. (Danve On Kishor Patil News) यावरून वाद निर्माण झाला असतांना पाटील यांनी शिवीगाळचे समर्थन केले असून, जो ज्या भाषेत बोलणार त्याला त्याच भाषेत उत्तर देण्याची आम्हाला बाळासाहेंबांची शिकवण असल्याचे त्यांनी सांगितले.
भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे एका सात वर्षीय मुलीवर अत्याचार करून तीचा खून केल्याप्रकरणी भडगाव तहसील कचेरीवर मोर्चा निघाला होता. (Shivsena) यावेळी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी भ्रमणध्वीवरून संपर्क करून पिडीतेच्या पालकांशी संवाद साधून त्यांचे सात्वंन केले होत. पाचोरा येथील आमदार पाटील (Kishor Patil) यांनी हा संवाद घडवून आणला होता.
किशोर पाटील यांनी खालच्या पातळीला जावून पत्रकार संदीप महाजन यांना शिवीगाळ केल्याचे कथित आॅडिओ क्लीपने एकच खळबल उडाली होती. (Marathwada) यावरून विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी किशोर पाटील यांच्यावर टीका केली आहे.
पाटील हे आता मंत्री अब्दुल सत्तार, आमदार संतोष बांगर यांच्या रांगेत जाऊन बसले आहेत, असा टोला त्यांनी लगावला. मिंधे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार संदीप महाजन यांना शिवीगाळ करून आपल्या वरिष्ठांच्या केलेल्या खुशामतीचा प्रत्यय दिला आहे.
पाटील हे आता मंत्री अब्दुल सत्तार आणि आमदार संतोष बांगर यांच्या रांगेत बसण्याच्या लायकीचे आहेत, हे काल दिसलं. एका पीडित कन्येसाठी त्यांनी उठवलेला आवाज एवढा झोंबण्याचे कारण काय? हे असले वर्तन त्यांच्या वरिष्ठांना बहुदा चालते कारण त्यांच्या विरोधात या गटातील एकानेही चकार शब्द काढलेला नाही, असेही दानवे यांनी सुनावले.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.