MLA Meghna Bordikar News Sarkarnama
मराठवाडा

MLA Meghna Bordikar News : आजोबांची जातीयवादी स्क्रिप्ट वाचणाऱ्या रोहित पवारांचे मनसुबे जनता उधळेल...

BJP News : शिंदे, फडणवीस, पवार यांच्या सरकारविरुद्ध बोलण्यासाठी त्यांच्याकडे कुठलेही मुद्दे नाहीत.

Prasad Shivaji Joshi

Parbhani Political News : रोहित पवार हे त्यांच्या आजोबांची जातीयवादाची जुनीच स्क्रिप्ट वाचून दाखवत आहेत. मात्र, त्यांचे मनसुबे मराठवाड्यातील जनता उधळून लावल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी दिला. (MLA Meghna Bordikar News) राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गटाचे) आमदार रोहित पवार यांनी नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांना अनाजी पंतांची उपमा दिली होती.

पूर्वीच्या काळात मराठेशाही एका अनाजी पंताने संपवली. आताच्या काळात महाराष्ट्र धर्म संपवण्याचे काम एक आधुनिक अनाजी पंत करत आहेत, असे त्यांनी म्हटले होते. भाजपच्या जिंतूर विधानसभेच्या आमदार मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar) यांनी यावर रोहित पवारांना (Rohit Pawar) प्रत्युत्तर दिले आहे. आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेकडे मराठवाड्यातील युवकांनी पाठ फिरवली आहे. यामुळे माध्यमांचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी कापूस वेचण्याची नौटंकी केली.

मराठवाड्यामध्ये आल्यानंतर ते आजोबा शरद पवार यांची जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करणारी जुनीच स्क्रिप्ट वाचून दाखवत आहेत. शिंदे, फडणवीस, पवार यांच्या सरकारविरुद्ध बोलण्यासाठी त्यांच्याकडे कुठलेही मुद्दे नाहीत. (Parbhani) तसेच मराठवाड्याच्या मागासलेपणासाठी कोण जबाबदार आहे, याची जाणीव मराठवाड्यातील युवा बांधवांना आहे. त्यामुळे रोहित पवार यांनी कितीही फुसके फटाके फोडले तरी त्यातून केवळ प्रदूषणच होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठवाड्याच्या मातीने निजाम राजवट उधळून लावली होती. आताच्या मराठवाड्यातील युवा बांधव तुमचे व तुमच्या आजोबांचे मनसुबे उधळून लावल्याशिवाय शांत बसणार नाही. बेरोजगारी,नोकऱ्यांचे कंत्राटीकरण, खासगीकरण यामुळे राज्यातील युवकांमध्ये असणाऱ्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी युवा संघर्ष यात्रा काढल्याचे रोहित पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले होते.

मात्र. युवा संघर्ष यात्रेचा संदर्भ देत इतिहासकालीन पात्रांची उपमा देऊन जातीयवादी टीका केल्याने भाजपच्या हाती आयते कोलित आले आहे. परभणी जिल्ह्यातील भाजपच्या एकमेव आमदार मेघना बोर्डीकर यांनी रोहित पवार यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्यावरील जातीयवादी टीकेला प्रत्युत्तर देत आक्रमक भूमिका घेतली आहे.

महाविकास आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाला जिंतूर विधानसभा मतदारसंघ मिळण्याची शक्यता असल्याने पक्षाला बळ देण्यासाठी रोहित पवार यांनी जिंतूरची निवड केली. मात्र, मराठा आरक्षण आंदोलन, राजकीय नेत्यांविषयी निर्माण झालेला रोष या सर्वांचा परिणाम युवा संघर्ष यात्रेत दिसून आला. रोहित पवार यांनी केलेल्या जातीयवादी टीका टिप्पणीने भाजप विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस( शरद पवार गट) यांच्यात वाकयुद्ध रंगले आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT