Sushma Andhare-Minister Sandipan Bhumre News, Auragnabad Sarkarnama
मराठवाडा

बाळासाहेबांमुळेच आमदार, मंत्री ; पक्षासाठी मोदी, शहा, फडणवीसांचे नाव घ्यायचे ना..

सात ते आठ मिनिटांच्या या फोन संभाषणात अंधारे यांनी भुमरेंना फारसे बोलूच दिले नाही. त्यामुळे त्यांनी फक्त ऐकण्याचे काम केले. ( Minister Sandipan Bhumre)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच आमदार, मंत्री झालो, तीस-पस्तीस वर्ष त्यांच्याच विचारांवर काम करत आहोत, त्यामुळे आमच्या पक्षाला बाळासाहेबांचे नाव मिळाले हा विजयच आहे, असा दावा (Marathwada) जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी केला आहे.

त्यावर तुम्हाला बाळासाहेबांचे नाव घेण्यावाचून पर्यायच नाही, त्या नावाशिवया तुमची किंमत शून्य आहे, असा पलटवार (Shivsena) शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. काल निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांच्या पक्षाला नवी नावं दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि बाळासाहेबांची शिवसेना अशी ती आहेत.

त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या उपनेत्या आणि शिंदे सरकारमधील मंत्री संदीपान भुमरे यांच्यात फोनवर झालेले संभाषण समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहे. अंधारे यांनी संदीपान भुमरे यांना बाळासाहेबांचे नाव न घेता मोदी, शहा, फडणवीसांचे नाव घेऊन राजकारण करून दाखवा असे खुले आव्हानच दिले.

त्याला भूमरे यांनी आम्ही बाळासाहेबांचेच आहोत ताई, त्यांच्यामुळे आमदार, मंत्री होवू शकलो हे आम्ही नाकारत नसल्याचे सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. तसेच शिवसेना-भाजपची ३५ वर्ष युती होती म्हणून आम्ही त्यांचे नाव घेतो असे समर्थन देखील केले. सात ते आठ मिनिटांच्या या फोन संभाषणात अंधारे यांनी भुमरेंना फारसे बोलूच दिले नाही. त्यामुळे त्यांनी फक्त ऐकण्याचे काम केले.

बाळासाहेबांमुळेच आम्ही आहोत, त्यांचे विचार पुढे नेणार असे सांगत त्यांनी बाजू सावरली. तर तुम्हाला बाळासाहेबांचे नाव घेण्याशिवाय पर्यायच नाही, भाजपसोबत गेलात तर मग मोदी, शहा, फडणवीसांचे नाव पक्षासाठी का घेतले नाही? असा सवाल करत त्यांनी भुमरेंची कोंडी केल्याचे पहायला मिळाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT