MLA Raju Navghare News Sarkarnama
मराठवाडा

Ajit Pawar Fund News: आमदार नवघरेंची शरद पवारांना साथ, तरी अजित पवारांनी दिला भरघोस निधी..

Marathwada Political News : पक्षाचे नाव व चिन्ह एकच असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष एकच असल्याचे नवघरे म्हणाले.

Prasad Shivaji Joshi

Hingoli NCP News : हिंगोली जिल्ह्यातील व विशेषतः वसमत विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी राज्य शासनाने भरघोस निधी दिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार गटातील आमदार राजू उर्फ चंद्रकांत नवघरे यांनी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत. विशेष म्हणजे मागील चौदा दिवसात नवघरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पाच वेळा भेट घेतली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) गटाचे परभणी जिल्हाध्यक्ष व विधान परिषद सदस्य आमदार बाबाजानी दुर्राणी हे नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार गटात सामील झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे यांना मिळालेला भरघोस निधी व गाठीभेटी चर्चेचा विषय ठरत आहे. (Hingoli) यासंदर्भात नवघरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विकासकामाच्या मान्यता व पाठपुराव्यासाठी ही भेट असून पक्षाचे नाव व चिन्ह एकच असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष एकच असल्याचे सांगितले.

अजित पवार यांनी महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर वसमतचे आमदार राजू नवघरे हे अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत असतील असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र नवघरे यांनी मतदारसंघातील नेते व कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर अजित पवार यांच्यासोबत न जाता शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला होता. (Marathwada) नवघरे यांनी राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

हिंगोली जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील बंधारे, औद्योगिक वसाहत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कर्करोग हॉस्पिटल तसेच कुरुंदा येथील पूर परिस्थिती कायमस्वरूपी दूर करण्यासाठी मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सव बैठकीत जो काही निधी मंजूर केला याबद्दल आभार व्यक्त केले. त्याआधी २२ सप्टेंबर रोजी सह्याद्रि अतिथीगृह, मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यतेखाली सिद्धेश्वर धरण, व पर्यटन विकास क्षेत्रासाठी/नियोजित कामासंदर्भात झालेल्या बैठकीत नवघरे उपस्थितीत होते.

तर १६ सप्टेंबर रोजी विविध विकासकामांसाठी निधीची मागणी करण्यासाठी व त्यापुर्वी १४ सप्टेबर रोजी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत विविध कामांना वित्त विभागाची मान्यता व निधी उपलब्ध करण्याबाबत झालेल्या बैठकीतही नवघरे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. १३ सप्टेबर रोजी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे नवघरेंनी अजित पवारांची भेट घेतली होती.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT