Congress Mla Pradnya Satav News Sarkarnama
मराठवाडा

Mla Pradnya Satav News : माझ्या तालुक्यात `रात्रीस खेळ चाले`, सातवांनी मांडली व्यथा..

Marathwada : अवैध वाळू वाहतूक करण्यासाठी विना क्रमांकाचे ट्रॅक्टर, ट्राॅली वापरले जातात, ही चिंतेची बाब आहे.

सरकारनामा ब्युरो

Congress : `सभापती महोदय, रात्रीस खेळ चाले ही मालिका आपल्या सगळ्यानांच माहित आहे. पण आमच्या कळमनुरी तालुक्यात रात्री कोणता खेळ चालतो हे मी सांगणार आहे`, असे म्हणत काॅंग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांनी आपल्या भागातील अवैध धंद्यांची माहिती सभागृहाला दिली. अंतिम आठवडा प्रस्तावावर त्या बोलत होत्या. चोऱ्या-माऱ्या, घरफोड्या, अवैध वाळू उपसा अशा सर्वच विषयांवर सातव यांनी सभागृहात भाष्य केले.

सातव म्हणाल्या, रात्रीस खेळ चाले ही मालिका आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण कळमनुरी तालुक्यात रात्री कोणता खेळ चालतो हे मी सांगणार आहे. (Congress) कयाधू नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा सुरू असून त्यावर कारवाई होत नसल्याने शासनाचा महसुल बुडतो आहे. (Marathwada) तालुक्यात १४ वाळू घाट आहेत, पण यापैकी एकाचाही लिलाव अद्याप झालेला नाही.

त्यामुळे वाळु माफियांचे फावले असून रात्रीच्या अंधारात सर्रास अवैध वाळू उपसा सुरू आहे.हे रोखण्यासाठी तहसिलदाराने सात पथके तयार केली, तरी रात्री वाळू उपसा माफियांकडून सुरूच आहे. कारवाई टाळण्यासाठी अवैध वाळू वाहतूक करण्यासाठी विना क्रमांकाचे ट्रॅक्टर, ट्राॅली वापरले जातात, ही चिंतेची बाब आहे.

२१ मार्च रोजी औढानागनाथ येथे चोरट्यांनी एकाचवेळी ५ दुकाने फोडली. एवढ्यावरच ते थांबले नाही दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी देखील दुकाने फोडण्याचे सत्र सुरूच होते. चोरांना, वाळू माफियांना कायद्याचा धाक न राहिल्यामुळे ते सातत्याने पोलिसांना आव्हान देतात. हिंगोली जिल्ह्यात चोरी, मारी, गुटखा, अवैध दारू सर्रास सुरू असून हे कधी थांबणार ? असा सवाल सभागृहात उपस्थिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT