Mla Bangar-Khaire News, Aurangabad
Mla Bangar-Khaire News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Mla Santosh Bangar : आता बांगर म्हणाले, खैरेंच्या क्लिपच बाहेर काढतो..

सरकारनामा ब्युरो

Winter Seesion News : चंद्रकांत खैरे हा कसा माणूस आहे, हे तिथल्या जनतेने दाखवून दिले आहे. वाईट नजर असलेला हा माणूस आहे, त्यांच्या क्लिप बाहेर काढल्या तर त्यांना आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी दिला आहे. (Shivsena) शिवसेना नेते संजय राऊत हे पिसाळलेल्या कुत्र्यासारखे आहेत, त्यांच्या कानाखाली वाजवाशी वाटते, अशी टीका आमदार बांगर यांनी केली होती.

यावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी बांगर (Santosh Bangar) हे पत्याचा क्लब चालवून हप्ता गोळा करतात, त्यांच्यावर खुनाचे गुन्हे आहेत, त्यांना आम्ही सरळ करू, असा आरोप करत दम भरला होता. यावर नागपूर येथे माध्यमांना प्रतिक्रिया देतांना बांगर यांनी खैरेंवर खळबळजनक आरोप केले आहेत.

बांगर म्हणाले, खैरेंची नजर वाईट आहे, त्यांना घरात न्यावे एवढी त्यांची लायकी नाही. त्यांच्या अनेक क्लीप आहेत, त्या जर बाहेर काढल्या तर खैरेंना आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही. त्यांच्याच शहरातील, त्यांच्याच पक्षाच्या माझ्या मित्राकडे त्या क्लिप आहेत. त्या बाहेर काढायला लावू नका, अशी धमकीच बांगर यांनी दिली.

माझ्यावर मटका चालवण्याचा, हप्ता घेण्याचा आरोप करत, असे असते तर मला लोकांनी निवडून दिले असते का? केवळ चिखलफेक करायची म्हणून माझ्यावर खैरे आरोप करत आहे. त्यांचे आता वय झाले आहे, मला भांडाफोड करायला लावू नका, असा इशारा देखील बांगर यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT