Shyamsunder Shinde
Shyamsunder Shinde sarkarnama
मराठवाडा

राऊत हे महाभारतातील संजय आहेत का ? ; श्यामसुंदर शिंदे संतप्त

सरकारनामा ब्युरो

नांदेड :"अपक्ष आमदारांनी शब्द देऊनही दगाबाजी केली आहे, त्यांची नावे आमच्याकडे आहेत," असे म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शनिवारी थेट अपक्ष आमदारांची नावंच सांगितली. (Shyamsunder Shinde latest news)

"बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर, राजेश पाटील, देवेंद्र भुयार (अपक्ष), संजय मामा शिंदे (अपक्ष), श्यामसुंदर शिंदे (अपक्ष) यांची मत आम्हाला मिळाली नाहीत," असे राऊत यांनी सांगितले. त्यावर श्यामसुंदर शिंदे (Shyamsunder Shinde)यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शिंदे माध्यमांशी बोलत होते.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेले आरोप कंधार -लोहाचे शेकापचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी फेटाळून लावले आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सहयोगी सदस्य आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ज्यांना मतदान करायला सांगितले त्यांनाच मी मतदान केले आहे," असे शिंदे म्हणाले. यावेळी राऊतांच्या विधानावर शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली.

"पक्षश्रेष्ठींनी सांगितल्याप्रमाणे पाच उमेदवारांपैकी कोणत्या तीन उमेदवारांना मतं द्यायची, ती मी दिलेली आहेत. राऊत वरिष्ठ आहेत, कोणी मतदान कुणाला केलं हे पाहण्याची विद्या महाभारतातील संजयप्रमाणे राऊतांना देखील प्राप्त झाली आहे का," असा खोचक टोला शिंदेंनी राऊतांना लगावला आहे,"

"मी आतापर्यंत १५ ते १६ अशा निवडणुकीच्या प्रक्रियेतून गेलो आहे, हे गुप्त मतदान होते. ते कुणाला दाखवायचे ते मी त्यांना दाखवलं आहे, पण इतर ५० आमदारांनी कोणाला मत दिले हे जर राऊतांना माहित असेल तर ते नक्कीच महाभारतातील संजय असतील," "मी कुणाला मत दिले याचा जाब विचारण्याचा अधिकार पक्षश्रेष्ठींनी आहे, ते मला विचारतील," असे सांगत शिंदेंनी अप्रत्यक्षपणे राऊतांना टोमणा लगावला.

राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha election) महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. धनंजय महाडिक यांनी विजय मिळवला. शिवसेनेचे (Shivsena) संजय राऊत, काँग्रेसचे (Congress) इमरान प्रताप गढी, राष्ट्रवादीचे (NCP) प्रफुल्ल पटेल, भाजपचे पियुष गोयल, अनिल बोंडे हे विजयी झाले आहे. मात्र महाविकास आघाडीची १० मते फुटल्याने सहाव्या जागवरचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT