Suresh dhas.jpg Sarkarnama
मराठवाडा

Suresh Dhas News: आमदार सुरेश धस यांची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल, कार्यालयाकडून मोठा खुलासा

Beed News: आमदार सुरेश धस यांचा आवाज असल्याचा आरोप होत असलेल्या आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपवरुन बीड जिल्ह्याचं राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवरुन विरोधकांसह सत्ताधारी पक्षांना घेरणारे आमदार सुरेश धस हेही अडचणीत आले आहे.

Deepak Kulkarni

Beed News: मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये समोरच्या व्यक्तीला शिवीगाळ आणि धमकी दिल्याचं दिसून येत आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे या कथित ऑडिओ क्लिपमधील आवाज बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सुरेश धस यांचा असल्याचा आरोप केला जात आहे. याचदरम्यान, आता याप्रकरणी एक महत्त्वाची राजकीय अपडेट समोर आली आहे.

आमदार सुरेश धस यांचा आवाज असल्याचा आरोप होत असलेल्या आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपवरुन बीड जिल्ह्याचं राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवरुन विरोधकांसह सत्ताधारी पक्षांना घेरणारे आमदार सुरेश धस हेही अडचणीत आले आहे. याचदरम्यान, आता धस यांच्या कार्यालयाकडून मोठा खुलासा करण्यात आला आहेत.

भाजप आमदार सुरेश धस यांच्या कार्यालयाकडून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपबाबत अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. त्यांच्या कार्यालयानं ऑडिओ क्लिपमधील आवाज आमदार धस यांचा नसल्याचा दावा केला आहे.

तसेच या ऑडिओ क्लिपद्वारे सुरेश धस यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा गंभीर आरोपही भाजप आमदाराच्या कार्यालयाकडून करण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या ऑडिओ क्लिपमधील अज्ञात कार्यकर्त्याला करण्यात आलेली शिवीगाळ आणि बघून घेण्याचा दिलेला इशारा देणारा आवाज धस यांचा असल्याचा आरोप झाल्यानंतर राजकीय विरोधकांना टीका करण्यासाठी आयतं कोलीत मिळालं आहे.

मात्र, भाजप आमदार सुरेश धस यांच्या कार्यालयानं केलेल्या खुलाशानंतर या ऑडिओ क्लिपमधील आवाज नेमका कोणाचा आहे, असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला आहे. या ऑडिओ क्लिपमार्फत राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. मात्र, धस यांच्या कार्यालयाच्या स्पष्टीकरणानंतर अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

सुरेश धस यांच्या बदनामीसाठीच ही ऑडिओ क्लिप करण्यात आली आहे. त्या क्लिपमधील समोरची व्यक्ती कोण आहे? ती कोणी व्हायरल केली, का केली? असे एक ना अनेक सवाल उपस्थित करतानाच याप्रकरणी कायदेशीर कारवाईचा फास आवळला जाण्याची शक्यता आहे. या ऑडिओ क्लिपबाबत कोणीही अधिकृत पुष्टी दिलेली नसल्याचं सध्यातरी दिसून येत आहे.

बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सुरेश धस हे त्यांच्या रोखठोक विधानांमुळे आणि राजकीय आरोप-प्रत्यारोपांमधील आक्रमक भूमिकेसाठी राज्यभर ओळखले जातात. ते विरोधकांवर तसेच प्रसंगी सत्ताधारी वा सहकारी पक्षातील नेत्यांवरही कोणताही भीडभाड न ठेवता कठोर शब्दांत ताशेरे ओढत दिसून येतात. त्याचसोबत ते नेहमीच आपल्या खासशैलीत विरोधकांना आव्हान देतानाच मी कुणाच्या बापाला भीत नाही असंही ठणकावून सांगतात.

सुरेश धस हे अगोदरही गेल्या वर्षे दोन वर्षांपासून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी संतोष देशमुख, महादेव मुंडे हत्या यांसह बीड जिल्ह्यातील अनेक वादग्रस्त व गंभीर गुन्हेगारी प्रकरणं, ऊसतोड कामगार तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरुन आवाज उठवला. मात्र,काही महिन्यांपूर्वी हेच आमदार धस त्यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश उर्फ 'खोक्या' भोसले याच्यामुळे एका मारहाणीच्या व्हिडीओमुळे अडचणीत आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT