Kannad : कन्नडचे ठाकरे गटाचे आमदार उदयसिंह राजपूत यांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Kannad) कन्नड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडी झाली आहे. शेतकरी विकास पॅनलच्या प्रचाराचा नारळ वाढवण्यासाठी ते तालुक्यातील मेहगावजवळील भगवानगड येथे गेले होते.
स्थानिक नेत्यांची भाषणं सुरू असतांना अचानक आमदार उदयसिंह राजपूत (Udaysingh Rajput) यांना अस्वस्थ वाटू लागले. तातडीने त्यांना कन्नड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Shivsena) प्राथमिक उपाचरानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील सिग्मा रुग्णालायत भरती करण्यात आहे. त्यांना उष्माघाताचा त्रास झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.
तत्पुर्वी कन्नड (Kannad) येथील खाजगी रुग्णालयात उपचार करणाऱ्या डाॅक्टरांनी राजपूत यांनी उपाशीपोटी गोळ्या घेतल्यामुळे त्यांना त्रास झाल्याचे निदान केले होते. राजपूत यांची प्रकृती आता चांगली असल्याचे सांगितले जाते. (Marathwada) बाजार समितीच्या निवडणुक प्रचाराला जोमाने सुरूवात झाली आहे. उदयसिंह राजपूत यांची प्रतिष्ठा या निमित्ताने पणाला लागली आहे.
कन्नड बाजार समितीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप-शिंदे युती अशी लढत आहे. बाजार समितीवरील सत्तेसाठी दोन्ही पॅनलमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. महाविकास आघाडी झाल्यामुळे ठाकरे गटाच्या प्रचाराची धुरा आमदार राजपूत यांच्यावर आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर झाल्यापासून राजपूत हे तालुक्यात फिरत आहेत. सध्या उन्हाचे चटके जाणवू लागल्याने त्याचा फटका राजपूत यांना बसला. डाॅक्टारांनी त्यांना काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.