Marathwada Graduate Constituency: "मराठवाडा पदवीधरांची पहिली पसंती सतीश चव्हाण हेच ठरतील", असा विश्वास व्यक्त करत विधान परिषदेतील त्यांचे जुने सहकारी माजी आमदार अमरसिंह पंडीत यांनी त्यांच्या चौथ्या विजयाचा दावा केला. गेवराईसारख्या तालुक्यातील मुलींच्या उच्च शिक्षणासाठी केलेले सहकार्य, छत्रपती संभाजीनगर येथे नॅशनल लाॅ स्कूल आणण्यासाठी सभागृहात त्यांनी केलेला पाठपुरावा, धडपड मी पाहिली आहे. आज सोशल मिडियावर 'सतीश चव्हाण यांनी काय केले'? हे विचारणाऱ्यांना त्यांनी आपल्या कामातून ठोस उत्तर दिल्याचे पंडित म्हणाले.
मराठवाडा पदवीधर संघाचे महायुती उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ अमरसिंह पंडित यांनी गेवराई शहरात महाविद्यालय तथा वकील संघाच्या बैठकीत मतदारांना आवाहन केले. मागील तीन टर्मच्या म्हणजेच अठरा वर्षात पदवीधरांचे नेतृत्व करताना सतीशभाऊंनी मराठवाड्याच्या शैक्षणिक विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण कामे केली आहेत. विधी क्षेत्रातील विविध प्रश्नावर त्यांनी आवाज उठवला आहे. यापुढेही ते तुमच्यासाठी काम करत राहतील.
छत्रपती संभाजीनगर येथे नॅशनल लॉ स्कूल मंजूर होण्यासाठी त्यांनी केलेला पाठपुरावा असो किंवा गेवराईसारख्या भागातील मुलींच्या उच्च शिक्षणासाठी केलेले सहकार्य असो, त्यांच्या कामाची ठोस उदाहरणे आपल्या समोर आहेत.आज सोशल मीडियावर सतीश चव्हाण यांनी काय केले?, असा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना त्यांच्या या कामातूनच स्पष्ट उत्तर मिळते.पदवीधर, विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे, याचा मी साक्षीदार असल्याचे पंडीत यांनी सांगीतले.
दरम्यान, विजयादशमीनिमित्त बीड येथे भारतीय जनता पार्टीचे डॉ.योगेश क्षीरसागर यांची सतीश चव्हाण यांनी भेट घेऊन त्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 23 ऑक्टोबर रोजी होत आहे. या निवडणुकीत डॉ.योगेश क्षीरसागर यांनी जाहीर पाठिंबा देऊन सर्व शक्तीनिशी सतीश चव्हाण यांच्या पाठीशी एकजुटीने उभे राहण्याचा निश्चय व्यक्त केला. सतीश चव्हाण यांच्या आतापर्यंतच्या तीन विजयामध्ये बीड जिल्ह्याचा मोठा वाटा राहिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.