Suhash Dashrathe-Raj Thackeray Sarkarnama
मराठवाडा

Mns : राज ठाकरेंकडून प्रतिसाद नसल्याने दाशरथेंचा मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र..

दाशरथे यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली होती. पण हे करत असतानांच त्यांच्या विरोधात राज ठाकरे यांच्याकडे तक्रारी देखील होत होत्या. (Mns Aurangabad)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : काही महिन्यांपुर्वी औरंगाबाद दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांनी आपल्या धक्का तंत्राला साजेसा निर्णय घेत मनसेचे जिल्हाप्रमुख सुहास दाशरथे यांना पदावरून हटवले. (Aurangabad) पक्षातील दाशरथे विरोधकांना या निर्णयाची कल्पना कदाचित असेलही पण त्यांच्या समर्थकांसाठी मात्र हा मोठा धक्का होता. (Mns) त्यामुळेच राज ठाकरेंच्या या निर्णयाविरोधात समाज माध्यांमधून प्रतिक्रया देखील उमटल्या. ` साहेब माझे काय चुकले`, अशी साद घालत दाशरथे यांनी राज ठाकरेंचा (Raj Thackeray) आदेश सिरसांवद म्हणत तो मान्यही केला.

पण पदावरून हटवले असले तरी आपण राज साहेबांचा कार्यकर्ता म्हणून पक्षात काम करतच राहू, असा पावित्रा घेतला आणि वेट अॅन्ड वाॅचचे धोरण स्वीकारले. दुसरीकडे दाशरथे विरोधकांनी त्यांच्या समर्थकांचे देखील पंख छाटण्याचे काम केले.अनेकांवर पक्षाची बदनामी सोशल मिडियावर केल्याचा आरोप ठेवत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. पण तरीही राज ठाकरे हे दाशरथे यांना पक्षात एखादी महत्वाची जबाबदारी देतील, असे चित्र देखील सोशल मिडियावर रंगवले गेले.

पण त्याला मनसेकडून अधिकृतपणा कुठलाच दुजोरा आजतागायत मिळाला नाही. अखेर सुहास दाशरथे यांनी आज आपल्या फेसबुकवर पेजवरून राज ठाकरे यांना हात जोडतांनाचा फोटो शेअर करत, `साहेब धन्यावद, माझा आपणास शेवटचा जय महाराष्ट्र`,असे म्हणत मनसेतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शहरातील मनसेमधील अंतर्गतगटबाजीचा फटका या पक्षाला बसल्याचे दिसून आले आहे.

दाशरथे यांचा मनसेचा कार्यकाळ दोन-तीन वर्षांचाच, पण शिवसेनेच्या पठडीत तयार झालेल्या पण त्या पक्षात कधीही आक्रमक न दिसलेल्या दाशरथे यांनी मनसेत गेल्यानंतर मात्र आपले वेगळेच रुप दाखवायला सुरूवात केली होती. शिवसेनेत आपले नेते असलेल्या चंद्रकांत खैरे यांच्या अंगावर पत्रके भिरकवत दाशरथे यांनी आपली ताकद दाखवून दिली होती.

दाशरथे यांच्यावर राज ठाकरे यांनी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवल्यानंतर तर दाशरथे यांचा वारू चौफेर उधळू लागला होता. आंदोलनं, निदर्शने आणि थेट शासकीय कार्यालयांमध्ये जाऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याची मुंबईतील मनसे स्टाईल त्यांनी औंरगाबादेत रुजवली. मग शहराच्या नामांतराचा प्रश्न असो, की पाणी, कचरा, रस्ते, वीज असे प्रश्न यावर दाशरथे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने आक्रमक आंदोलन करत पक्षात जिवंतपणा आणण्याचे काम केले होते. शिवजंयती असो, की कोरोनामध्ये मराठी माणसासोबतच परप्रांतीयांना देखील मदत करण्याची त्यांची भूमिका सगळ्यांनाच भावली होती.

अर्थात तेव्हा देखील पक्षात दोन गट होते हे उघडपणे दिसत होते. पण दाशरथे यांनी त्याकडे दुर्लक्ष करत आंदोलनाचा सपाटा लावला होता. शिवसेनेला थेट अंगावर घेत येथील नेत्यांवर आरोप करत दाशरथे यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली होती. पण हे करत असतानांच त्यांच्या विरोधात राज ठाकरे यांच्याकडे तक्रारी देखील होत होत्या. त्या किती गंभीर स्वरुपाच्या होत्या याचा अंदाज राज ठाकरे यांनी दाशऱथे यांना तडकाफडकी बदलण्याच्या निर्णयावरून स्पष्ट होते.

पदावरून बाजूला केल्यानंतरही काही महिने दाशरथे यांनी वाट पाहिली, साहेब आपल्याला बोलावतील, म्हणणे ऐकून घेतील अशी आशा ते बाळगून होते. परंतु राज ठाकरे यांनी निर्णय घेतला त्या दिवसापासून आजतागायत दाशरथे यांच्या संदर्भात कुठलीच भूमिका घेतली नाही. त्यामुळे अखेर दाशरथे यांनी मनसेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येते. आता दाशरथे कोणत्या पक्षाची वाट धरतात, की मग स्वगृही परततात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT