MNS Protest Against Governor News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

MNS : वय झालेले राज्यपाल महाराष्ट्राला नको, त्यांना परत दिल्लीला बोलवा..

राज्यपालांना महापुरुषांचा आदर राखता येत नसेल, अशा राज्यपालांची महाराष्ट्राला गरज नाही. (MNS)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा काल भाषणात एकेरी उल्लेख केला. Governor त्याचप्रमाणे महाराजांची तुलना देखील चुकीच्या पद्धतीने केली. Maharashtra महाराज हे आमचे देव आहेत, त्यांचे रक्त आमच्या नसानसात भिनलेले आहे. त्यामुळे त्यांची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही.

राज्यपालांचे आता वय झाले आहे, म्हणून ते अशा प्रकारची बेताल विधानं करत आहेत, त्यांना परत पाठवा, अशी मागणी करत (MNS)महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहरात निदर्शने करण्यात आली. (Bhagat Singh Koshyari) राज्यपालांचा निषेध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने टीव्ही सेंटर चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकारकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मागणी करण्यात आलेली आहे की महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे वारंवार वादग्रस्त वक्तव्य करून महापुरुषांचा अपमान करत आहेत. त्यांचे आता वय झाले आहे म्हणून यांना केंद्र सरकारने परत बोलवावे. असे राज्यपाल आम्हाला नको आहेत.

काही दिवसांपूर्वी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल देखील त्यांनी चुकीची भाषा वापरली होती. ज्या राज्यपालांना महापुरुषांचा आदर राखता येत नसेल, अशा राज्यपालांची महाराष्ट्राला गरज नाही.

त्यामुळे त्यांना परत दिल्लीला बोलावून घ्यावे, अशी मागणी देखील यावेळी आंदोलकांनी केली. राज्यापालांच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. यावेळी मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT