Mns March Update News
Mns March Update News Sarkarnama
मराठवाडा

MNS March News : पोलिसांनी परवानगी नाकारली, तरी मनसे आज मोर्चा काढणार ...

सरकारनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) वतीने काढण्यात येणाऱ्या स्वप्नपुर्ती रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारत नोटीस बजावली आहे. असे असले तरी मोर्चा काढण्यावर मनसे ठाम असून शहरातील संस्थान गणपती मंदिर येथे कार्यकर्त्यांची जमवाजमव सुरू केली आहे. याशिवाय बाहेरच्या जिल्ह्यातून देखील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते दाखल होत आहे.

आज अकरा वाजता ही स्वप्नपुर्ती रॅली संस्थान गणपती येथून विभागीय आयुक्त कार्यालयावर जाणार आहे. केंद्र सरकारने औरंगाबाद (Aurangabad) शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केले आहे. या निर्णयानंतर संपूर्ण महाराष्ट्रात आणि छत्रपती संभाजीनगर शहरात प्रचंड आनंदाचे वातावरण आहे. (Marathwada) परंतू या आनंदावर काही लोक विरजण घालण्याचे काम करत आहेत. त्यांनी कुठलेही कारण नसतांना छत्रपती संभाजीनगर नावास विरोध केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या अगोदरच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार ज्या प्रमाणे विरोध होईल त्याच प्रमाणे उत्तर देण्यात येईल हे सांगण्यात आले होते. आता छत्रपती संभाजीनगर हे नाव व्हावे ही इथल्या जनतेची आणि मनसेची इच्छा स्वप्न होते. ते स्वप्न सत्यात उतरल्यामुळे १६ मार्च रोजी मनसेच्या वतीने शहरातून स्वप्नपुर्ती रॅली काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.

या मोर्चासाठी मनसेच्या वतीने पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र सिटीचौक पोलिसांनी काल ही परवनागी नाकारत मनसेला नोटीस बजावली आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था भंग होईल, सार्वजनिक वाहतुकीस कुठलाही अडथळा निर्माण झाला, अनावश्यक गर्दी जमवली तर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे या नोटीसीत बजावण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांना ही नोटीस काल सिटीचौक पोलिसांनी बजावली आहे.

दरम्यान, पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी मोर्चा निघणारच, त्यासाठी मोठ्या संख्येने मनसैनिक शहरात दाखल होत असल्याचे खांबेकर यांनी म्हटले आहे. अनेक दशकांपासूनचे स्वप्न छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांचे पूर्ण झाले असून त्या सर्व लोकांना सोबत घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने `स्वप्नपूर्ती रॅली` काढणार असल्याचे जाहीर केले होते. आज साडेअकरा वाजता समर्थन रॅलीला संस्थान गणपती येथून सुरूवात होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT