Raj Thackeray Talk With District President News
Raj Thackeray Talk With District President News Sarkarnama
मराठवाडा

Raj Thackeray Talk With District President : मनसेचे लक्ष्य महापालिका, जिल्हा परिषद ; जिल्हाध्यक्षांकडून घेतला आढावा..

सरकारनामा ब्युरो

Marathwada : आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवत मनसेने तयारी सुरू केली आहे. (Raj Thackeray Talk With District President) यासाठी राज्यातील सर्वच जिल्हाध्यक्षांची बैठक शिवतीर्थावर घेतली जात आहे. राज ठाकरे स्वतः प्रत्येक जिल्हाध्यक्षाशी थेट बोलून त्या त्या जिल्ह्यातील पक्षाची सद्य परिस्थिती, महापालिका, जिल्हा परिषदेच्या दुष्टीने करावयाची तयारी याचा आढावा घेत आहेत.

छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्याची राजधानी असलेले महत्वाचे शहर असल्याने या ठिकाणी मनसेची ताकद कशी वाढवता येईल यावर देखील बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. (MNS) मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांच्याशी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी संघटनात्मक बाबींवर चर्चा केली. मनसेकडे शहरात तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे.

गेल्या दोन-तीन वर्षात मनसेने नागरी प्रश्नांवर लक्षवेधी आंदोलने देखील केली होती. यात प्रामुख्याने शहरवासियांना २४ तास पाणी मिळावे यासाठीचे आंदोलन लक्षवेधी ठरले होते. (Marathwada) या शिवाय स्वच्छता, रस्त्यांवरील खड्डे, वीज अशा विषयांवर मनसेच्या आंदोलनांने प्रशासनाला घाम फोडला होता. गेल्या महापालिका, जिल्हा परिषदेचा विचार केला तर मनसेला या दोन्ही ठिकाणी फारसे प्रतिनिधित्व नव्हते.

महापालिकेत या पक्षाचा एकही नगरेसवक नव्हता. हीच परिस्थिती जिल्हा परिषदेत देखील पहायला मिळते. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये प्रतिनिधित्व नसले तरी मनसेने शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक विषयांसह सामान्य नागरिकांच्या प्रश्नावर कायम आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले होते. राज ठाकरे यांचे देखील शहरावर बारीक लक्ष असल्यामुळे त्यांचे देखील अधूनमधून दौरे होत असतात. कोरोनामुळे तब्बल दोन-अडीच वर्ष लांबलेल्या महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका येत्या आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुंबईत जिल्हाध्यक्षांच्या बैठकांचा धडका सुरू केला आहे. सुमीत खांबेकर यांच्याकडून त्यांनी छत्रपती संभाजीनगर महानगर पालिका निवडणूक, पक्षाची सद्यस्थिती जाणून घेतली. छत्रपती संभाजीनगरची महानगर पालिका पक्ष ताकदीने लढवणार असून त्याबाबतच्या सूचना राज ठाकरे यांनी दिल्या आहेत. तसेच पुढील महिन्यात राज ठाकरे जिल्ह्याचा दौरा करणार असून यावेळी पदाधिकारी बैठक- मेळावा, नागरिकांशी संवाद, पदाधिकाऱ्यांचा अहवाल तपासण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT