Mns Warn KCR Rally In Nanded News
Mns Warn KCR Rally In Nanded News Sarkarnama
मराठवाडा

MNS Warn News : आधी बाभळीचा पाणीप्रश्न सोडवा, मगच पाय ठेवा ; केसीआरांची सभा उधळणार

सरकारनामा ब्युरो

Nanded : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर अर्थात के. चंद्रशेखर राव यांच्या सभेची जय्यत तयारी सध्या नांदेडमध्ये सुरु आहे. त्यांच्या बीआरएस (भारत राष्ट्र समिती)चे अनेक नेते, मंत्री, खासदार, आमदार या सभेच्या तयारीसाठी नांदेडमध्ये तळ ठोकून आहेत. उद्या रविवारी (ता.पाच फेब्रुवारी) ही सभा होणार असतानाच (MNS)मनसेचे जिल्हाध्यक्ष माॅन्टिसिंग जहागिरदार यांनी सभा उधळून लावण्याचा इशारा पत्रकाद्वारे दिला आहे.

नांदेड (Nanded) जिल्ह्याच्या धर्माबादजवळील बाभळीच्या पाण्याचा प्रश्न सुटेपर्यंत बीआरएस आणि त्यांचे मुख्यमंत्री केसीआर यांना नांदेड जिल्ह्यात पाय ठेवू देणार नसल्याचे मनसे नमूद केले आहे. तेलंगणातील भारत राष्ट्र समिती या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आपली पाळेमुळे रोवण्यास सुरुवात केली. (Marathwada) बाभळीच्या पाणी प्रश्नावर महाराष्ट्रातील नेत्यांना दोष देवून बीआरएसचा महाराष्ट्राच्या राजकारणात तेलंगणाची मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांच्या सभेने श्रीगणेशा होणार आहे.

नांदेड जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांच्या निष्काळजीपणाचा फायदा घेत कर्नाटक-बेळगाव सीमावर्ती भागातील गावांचा प्रश्न व तसेच सीमेवरील गावांचा आणि मराठी भाषिकांवर अन्याय, पाणी प्रश्नापासून ते रेल्वे प्रश्नापर्यंत जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकार अपयशी ठरल्याचा ठपका ठेवून बीआरएस पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश करीत आहे. परंतु, नांदेड जिल्ह्यातील एकही राजकीय पुढारी त्यास विरोध करण्यास तयार नसून मूग गिळून गप्प बसल्याची टीका मनसेने केली आहे.

गोदावरी नदी ही दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी आहे. महाराष्ट्रात ५० टक्के भाग या नदी खोऱ्याने व्यापला आहे. गोदावरी खोऱ्यातील भौगोलिक क्षेत्र पाहता उपलब्ध पाण्याच्या झालेल्या वाटपाबाबत केंद्र शासनाने नेमलेल्या न्यायमूर्ती बच्छाव यांच्या अध्यक्षतेखालील लवादाने १९८० मध्ये दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्राला गोदावरी खोऱ्यातील ४९ टक्के भौगोलिक क्षेत्र असताना प्रत्यक्षात पाणी वाटप ३१ टक्के हिस्सा देण्यात आला.

तसा अहवाल दिला असतानाही बीआरएस सरकारच्या मनमानी कारभारामुळे महाराष्ट्राबद्दल दुट्टपी भूमिका घेणाऱ्या सरकारचा मनसेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. तसेच रविवारी काळे झेंडे दाखवून त्यांची नांदेड येथे होणारी पहिली सभा उधळून लावू, असा इशारा पत्रकाद्वारे दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT