CNG Gas- Pm Modi
CNG Gas- Pm Modi Sarkarnama
मराठवाडा

मोदी सरकारकडून नव्या वर्षातही महागाईचे चटके ; आता सीएनजी, पीएनजी गॅस महागला

सरकारनामा ब्युरो

मुंबई ः केंद्रातील मोदी सरकारकडून सर्वसामान्यांना महागाईचे चटके सुरूच आहेत. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसनंतर आता (CNG) सीएनजी, पीएनजी गॅसच्या दरात देखील नव्या वर्षात वाढ करण्यात आली आहे. (Narendra Modi) नवीन वर्षातही मोदी सरकारने जनतेला महागाईचे गिफ्ट दिले आहे. (Price Hike)

८ जानेवारीच्या मध्यरात्री सीएनजीच्या दरात २.५० (अडीच रुपये) रुपयांची तर घरगुती पाईपलाईन गॅस म्हणजेच पीएनजीच्या दरात १.५० (दीड रुपये) रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता सीएनजी ६६ रुपये तर पीएनजी ४० रुपये किलो होणार आहे.

मागील वर्षभरात सीएनजीच्या दरात तब्बल १८ रुपयांची वाढ झाली आहे. जानेवारी २०२१ मध्ये ४८ रुपये प्रति किलो मिळणारा सीएनजी आता २०२२ च्या पहिल्याच महिन्यात ६६ रुपये प्रति किलोने मिळणार आहे.

मोदी सरकारच्या या नव्या दरवाढीमुळे आता सीएनजीवर चालणाऱ्या खासगी तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील वाहनांना फटका बसणार आहे. अनेक शहरांमध्ये रिक्षा, टॅक्सी, बस या सीएनजीवर धावत असतात.

अशावेळी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचेही दर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांचे जीवन महागाईने त्रस्त करण्याचा चंग मोदी सरकारने बांधला असल्याची टीका या निमित्ताने होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT