<div class="paragraphs"><p>Mp Imtiaz Jaleel</p></div>

Mp Imtiaz Jaleel

 

Sarkarnama

मराठवाडा

लग्न कधी करायचे, मुल जन्माला कधी घालायची हे मोदींनी ठरवू नये..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद ः केंद्रातील मोदी (Narendra Modi) सरकार मुलीच्या लग्नाचे वय १८ वरुन २१ करण्याचे विधेयक या अधिवेशनात आणू पहात आहे. (Aimim)मुलींना मानसिक आणि शारीरिक सक्षम झाल्यावरच लग्न करण्याचा निर्णय घेता यावा हा यामागचा हेतू असल्याचे सांगितले जाते. (Mp Imtiaz Jaleel) परंतु या वरून देखील आता राजकारण सुरू झाले असून विधेयक चर्चेला येण्याआधीच एमआयएमने याचा विरोध केला आहे.

खासदार इम्तियाज जलील यांनी विधेयकाचा विरोधक करतांना ` कुणी लग्न कधी करायचे, मुल जन्माला घालायचे की नाही? हे मोदींनी ठरवू नये`, असे म्हणत उलट आमदार, खासदार होण्यासाठीची वयोमर्यादा घटवा, अशी मागणी केली आहे.

मुलींना सक्षम होऊन लग्नाचा निर्णय स्वतः घेता यावा यासाठी लग्नाचे वय १८ वरून २१ करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त करत खासदार इम्तियाज जलील यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलतांना बहुमताच्या जोरावर हे सरकार कुणी काय खायचे, कपडे काय घालायचे, लग्न कधी करायचे हे ठरवू लागले आहे.

या देशात लोकशाही आहे याचा त्यांना विसर पडला आहे का? असा सवाल केला आहे. इम्तियाज जलील म्हणाले, जर १८ वर्ष पुर्ण केलेली व्यक्ती किंवा तरुण देशाचा पंतप्रधान निवडू शकत असेल, तर मग त्याच्या लग्नासाठी २१ वर्ष वयाची अट का? सरकारचा हे विधेयक आणण्यामागे नेमका हेतू काय आहे? हे त्यांनी स्पष्ट करावे.

भारत हा तरुणांचा देश आहे, प्रतिभावान आणि जागतिक पातळीवर चमकणारे तरुण-तरुणी आपल्या देशात आहेत. उलट त्यांना राजकारणात आमदार-खासदार होण्यासाठी जी वयाची अट आहे ती कमी केली पाहिजे. त्यांच्या ज्ञानाचा आणि उर्जेचा वापर देशाच्या विकासासाठी करून घेतला पाहिजे.

परंतु वय झालेल्या पंतप्रधान मोदींना आपल्या देशातील तरुणांवर विश्वास नाही, असेच यावरुन दिसते,असा टोला देखील इम्तियाज जलील यांनी लगावला. निवडणुका आल्या की त्या त्या राज्यातील मुलभूत प्रश्नांवरील लक्ष विचलित करण्यासाठीच सरकारकडून असे निर्णय घेतले जातात. पण लोकशाही असलेल्या भारतामध्ये बहुमताच्या जोरावर तुम्ही असे निर्णय घेऊ शकत नाहीत, आमचा या विधेयकाला विरोध असेल, असेही इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT