Jyotishya Vastu Conference News, Aurangabad
Jyotishya Vastu Conference News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Political Prediction : मोदी २०२४ मध्ये पुन्हा पंतप्रधान, पण चार वर्षांनी पद सोडतील..

सरकारनामा ब्युरो

Jyotishya Vastu Conference : नरेंद्र मोदी हे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक ४१८ जागा जिंकत पुन्हा एकदा पंतप्रधान पदावर विराजमान होतील. Narendra Modi त्यांना विरोधकांच्या विरोधाचा प्रचंड सामना करावा लागेल, पण राष्ट्रवाद आणि आंतकवादाच्या मुद्यावर ते भाजपला मोठे यश मिळवून देतील, अशी भविष्यावाणी करण्यात आली आहे.

औरंगाबाद येथे १२ व १३ डिसेंबर अशा दोन दिवसीय तिसऱ्या राष्ट्रीय ज्योतीष्य वास्तू महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. (Bjp) या दरम्यान, निवडणूकीतील राजयोग या विषयावर ज्योतिष्याचार्य अनंत पांडव यांनी वरील भविष्यावाणी केली आहे. (Marathwada) नरेंद्र मोदी यांच्या कुंडलीत राजयोग आहे, त्यामुळे अनेक विरोधक तयार होऊन देखील त्यावर ते मात करण्यात यशस्वी होतील.

येणारी लोकसभेच्या निवडणुकीत आतंकवाद हा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे. राष्ट्रवाद आणि आतंकवाद या भोवती २०२४ च्या निवडणुकीचा प्रचार राहील आणि त्यात भाजप तब्बल ४१८ जागा जिंकेल. पण पंतप्रधान पदाचा कार्यकाळ पुर्ण होण्याआधी मोदी २०२८ मध्येच दुसऱ्याकडे जबाबदारी देतील, असे भाकित पांडव यांनी केले आहे.

राहुल गांधी यांना देखील राजयोग आहेत, पण त्यांच्या पंतप्रधान पदामध्ये अंतर्गत विरोधाचे अडथळे आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दिल्लीचे अरविंद केजरीवाल यांच्या कुंडलीत देखील यापुढेही राजयोग असल्याने ते आपले पद कायम राखतील, असेही पांडव यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपुर्वी आघाडी सरकार कोसळणार आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार अशी भविष्यावाणी पांडव यांनी १८ दिवसांआधी केली होती. ती खरी ठरल्यानंतर आता मोदी पुन्हा पंतप्रधान होणार पण २०२८ मध्ये ते पद सोडतील आणि जबाबदारी दुसऱ्या व्यक्तीवर सोपवतील असा दावा केला आहे. आता मोदींचा राजकीय वारसदार कोण असणार? याची चर्चा सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT