Ashok Chavan Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan On Budget : अशोक चव्हाण म्हणतात हा अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने उचललेले पहिले पाऊल...

Ashok Chavan On Budget 2024 : शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकासासाठी सुमारे 1.5 लाख कोटींची तरतूद केंद्रीय अर्थमंत्र्यांनी प्रस्तावित केली आहे. सुमारे 2 लाख कोटी रुपये खर्चाच्या 5 योजनांतर्गत पुढील 5 वर्षांमध्ये 4 कोटींहून अधिक रोजगार निर्मिती केली जाणार आहे.

Jagdish Pansare

BJP News : केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा पाहिला अर्थसंकल्प काल सादर झाला. इंडिया आघाडीने या अर्थसंकल्पावर टीकेची झोड उठवत हा केवळ बिहार, आंध्र प्रदेशचा अर्थसंक्लप असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे भाजपचे खासदार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मात्र नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेच्या दिशेने पहिले पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प असल्याचे सांगत कौतुक केले आहे.

पाच वर्षातून चार कोटींची रोजगार निर्मिती हा महत्वाचा निर्णय अर्थसंकल्पात घेण्यात आल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सितारमण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी (Narendra Modi) यांची विकसित भारताची संकल्पना पूर्णत्वास नेण्याच्या दिशेने उचललेले पहिले पाऊल आहे. शेतकरी, महिला, युवक, गरिब आणि मध्यमवर्गाला डोळ्यासमोर ठेवून मांडलेला हा एक समतोल अर्थसंकल्प आहे.

यामध्ये शिक्षणाच्या सुविधा, रोजगार निर्मिती, कौशल्य विकास आणि एमएसएमईवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटींची तरतूद आहे. तेलबियांच्या उत्पादनात देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी धोरण या अर्थसंकल्पातून प्रतिबिंबित होते. भाजीपाल्याला मागणी असलेल्या बाजार क्षेत्रानजिक मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादनासाठी क्लस्टर्स विकसित करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

महिला आणि मुलींच्या कल्याणासाठी असलेल्या योजनांवर सुमारे 3 लाख कोटींहून अधिक रक्कम खर्च केली जाणार आहे. एकूण श्रमशक्तीमध्ये महिलांची भागीदारी वाढविण्यासाठी अनेक चांगले निर्णय घेण्यात आल्याचे चव्हाण (Ashok Chavan) यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. सोने-चांदीवरील सीमाशुल्क 15 टक्क्यांवरून 6 टक्के केल्याने दागिने स्वस्त होणार आहेत. शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकासासाठी सुमारे 1.5 लाख कोटींची तरतूद केंद्रीय अर्थमंत्र्यांनी प्रस्तावित केली आहे.

सुमारे 2 लाख कोटी रुपये खर्चाच्या 5 योजनांतर्गत पुढील 5 वर्षांमध्ये 4 कोटींहून अधिक रोजगार निर्मिती केली जाणार आहे. देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज आणि मुद्रा कर्जाची मर्यादा 10 लाखांवरून 20 लाख रुपये करण्याच्या घोषणेमुळे तरुणांना लाभ होणार आहे. एक कोटी तरुणांना दरमहा 5 हजार रुपये भत्ता आणि एक वेळची मदत म्हणून 6 हजार रुपयांसह टॉप 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी दिली जाणार आहे.

देशाचा महागाई दर नियंत्रणात आणि स्थिर असल्याचे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितले. नागरिकांच्या बचतीत वाढ होईल, असेही अनेक निर्णय त्यांनी प्रस्तावित केले आहेत. आयकराच्या रचनेतील बदलांमुळे सर्वसामान्य करदात्यांची मोठी बचत होणार आहे. (Budget) कर्मचाऱ्यांसाठी वजावट मर्यादा 50 हजारांवरून 75 हजार तर कौटुंबिक पेन्शनर्ससाठी 15 हजारांवरून 25 हजार रुपये केल्याने त्यांच्याकडे अधिक पैसा उपलब्ध होऊ शकेल.

पायाभूत सुविधांना दिलेले भक्कम पाठबळ, गृहनिर्माण व ग्रामीण रस्त्यांसाठीचे निर्णय, विदेशी कंपन्यांच्या कर रचनेत पूरक बदल करून विदेशी गुंतवणुकीला अधिक चालना देण्याचा प्रयत्न, सर्व समाजघटकांच्या अपेक्षा ओळखून त्यांची पूर्तता करण्यावर दिलेला जोर, पुढील काळातील आव्हाने ओळखून संशोधन कार्याला चालना आदींमुळे यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प स्वागतार्ह असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT