Sharad Pawar and MP Amol Kolhe  Sarkarnama
मराठवाडा

Sharad Pawar Beed Sabha: शरद पवारांच्या बीडच्या सभेला डॉ.अमोल कोल्हेंची दांडी ? राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण

MP Amol Kolhe News : पक्षाच्या प्रचार प्रमुखपदाची जबाबदारी असताना देखील खासदार कोल्हे यांची गैरहजेरी हा चर्चेचा विषय ठरत आहे.

सरकारनामा ब्यूरो

Beed News: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची तोफ आज बीडमध्ये धडाडणार आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांची मराठवाड्यात पहिलीच सभा होत असल्याने अनेकांच्या नजरा या सभेकडे लागल्या आहेत. पवारांच्या स्वागतासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठी तयारीही केली आहे.

या सभेसाठी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवारांसह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार प्रमुखपदी नव्याने नियुक्त झालेले आणि शिरुरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे या सभेला दांडी मारणार आहेत.

पूर्व नियोजित कार्यक्रम असल्यामुळे आपण बीडमधील सभेला उपस्थित राहणार नसल्याचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. मात्र, पक्षाच्या प्रचार प्रमुखपदाची जबाबदारी असताना देखील खासदार कोल्हे यांची ही गैरहजेरी हा चर्चेचा विषय ठरत आहे.

पक्षात पडलेल्या फुटीनंतर अमोल कोल्हे यांनी शरद पवारांना साथ देत खांद्याला खांदा लावून लढण्याचे आश्वासन येवल्यातील सभेत कोल्हेंनी दिले होते. पण असे असतानाही खासदार कोल्हेंची सभेसाठीच्या गैरहजेरीने तर्कवितर्क वर्तविले जाऊ लागले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील 'बंडा'च्या वादळानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार आता राज्यभर फिरून बंडखोरांचे राजकीय मोपमापच करणार आहेत. पहिल्या टप्प्यातील सभांपाठोपाठ पवारसाहेब पुढच्या दोन दिवसांत मराठवाड्यांनतर फुटीर नेत्यांच्या मतदारसंघात जाणार आहेत.

यातच पवारसाहेबांच्या बीडमध्ये होणाऱ्या या सभेकडे राज्याचे लक्ष लागले असून ते या सभेच्या माध्यमातून विरोधकांसह फुटीर नेत्यांबाबत काय निशाणा साधतात, ते पाहणे महत्वाचे असणार आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT