Mp Imtiaz Jalil On Ram Temple News Sarkarnama
मराठवाडा

Mp Imtiaz Jalil On Ram Temple : एक मंदिर वाचवून मी हजारो मशिदी वाचवल्या...

Marathwada : सामाजिक वातावरण बिघडवून हिंदू-मुस्लिमांमध्ये द्वेष निर्माण करू पाहणाऱ्यांचे मनसुबे उधळले गेले.

सरकारनामा ब्युरो

Aimim : रामनवमीच्या दिवशीच छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात दंगल झाली. या दंगलीत राम मंदिराला लक्ष्य करण्याचा दंगेखोरांचा विचार होता. (Mp Imtiaz Jalil On Ram Temple) मंदिरावर हल्लेखोर चाल करून जाणार होते, पण याचे परिणाम किती भंयकर होतील याची जाणीव असल्यामुळेच मी मंदिर वाचवण्यासाठी आत गेलो.

मंदिरापासून दंगेखोराना हुसकावून लावले. ते जर मी केले नसते तर देशातील किती तरी मशिदींना धोका पोहचला असता. (Aimim) त्यामुळे मी मंदिर वाचवले म्हणून टीका करणाऱ्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे, राम मंदिर वाचवले म्हणून देशभरातील अनेक मशिदी वाचल्या, असा दावा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी केला आहे.

पक्षाच्या एका सभेत बोलतांना इम्तियाज जलील यांनी किरा़डापुरा दंगलीचा संदर्भत देत आपल्यावर आरोप करणाऱ्यांना वस्तुस्थिती सांगितली. (Aurangabad) हिंदुत्ववादी संघटनांनी इम्तियाज जलील यांच्यावर ते राम मंदिर वाचवण्यासाठी नाही, तर स्वतःला वाचवण्यासाठी मंदिरात लपले होते असा आरोप केला होता. तर दुसरीकडे इम्तियाज यांनी राम मंदीर वाचवले म्हणून त्यांच्यावर मुस्लिम समाजाकडून टीका केली जात आहे.

या सगळ्या टीका आणि आरोपांना इम्तियाज यांनी आपल्या भाषणातून प्रत्युत्तर दिले. किराडपुरा दंगलीत राम मंदिराला इजा झाली असती, तर त्याचे किती भयंकर परिणाम केवळ शहरात, राज्यातच नाही तर देशात झाले असते याची जाणीव त्यांनी करून दिली. हो मी राम मंदिर वाचवले, पण मंदिर वाचवले म्हणून देशभरातील हजारो मशिदी वाचल्या.

एक मंदिर वाचले नसते तर देशातील मशिदींची काय अवस्था झाली असती, याचा विचार माझ्यावर टीका करणाऱ्यांना नाही. सामाजिक वातावरण बिघडवून हिंदू-मुस्लिमांमध्ये द्वेष निर्माण करू पाहणाऱ्यांचे मनसुबे त्या एका राम मंदिर वाचवण्यामुळे उधळले गेले. पण काही लोकांना हे रुचले नाही, म्हणून ते माझ्यावर टीका करतायेत, असेही इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT