MP Imtiaz Jaleel News
MP Imtiaz Jaleel News Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jaleel On Maratha Protest : मनोजभाऊ उपोषण सोडा, लाख मराठा सोबत घेऊन मुंबईत धडक द्या..

Jagdish Pansare

Maratha Reservation News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी खासदार इम्तियाज जलील आज अंतरवाली सराटी येथे गेल होते. (Aimim News) मनोज जरांगे यांची ताकद काय आहे, हे महाराष्ट्राने पाहिले आहे. पण माझी त्यांना एक विनंती आहे, मराठा आरक्षणाचा समाजासाठी त्यांनी उभा केलेला लढा असाच सुरू ठेवायचा असेल तर त्यांनी उपोषण मागे घ्यावे.

कारण हा लढा लढण्यासाठी तुमच्या अंगात शक्ती असायला हवी. उपोषणामुळे ती कमी होते, एक मराठा लाख मराठा काय करू शकतो हे मनोजभाई तुम्ही दाखवून दिले आहे. (Maratha Reservation) आता उपोषण सोडा आणि एक मराठा लाख मराठ्यांना सोबत घेऊन मुंबईत धडक द्या, असे आवाहन इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी केले. मराठा आरक्षणासाठी माझा आणि आमच्या पक्षाचा तुम्हाला कायम पाठिंबा राहील, तुम्ही मागितला नाही, तरी आम्ही तो देणार.

आज मोठ्या भावासाठी आणखी वाट पाहण्याची आमची तयारी आहे. आज आम्ही तुमच्यासाठी उभे राहतो, उद्या तुम्ही आमच्यासाठी उभे राहाल, अशी अपेक्षा देखील इम्तियाज यांनी यावेळी व्यक्त केली. (Marathwada) अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला, तसेच पोलिसांच्या लाठीहल्ल्याविरोधात आज पुकारण्यात आलेल्या बंदला देखील इम्तियाज यांनी पाठिंबा दर्शवला होता.

त्यानंतर आज दुपारी इम्तियाज यांनी अतंरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. जरांगे यांची तपासणी करण्यासाठी आलेल्या डाॅक्टरांचा संदर्भ देत इम्तियाज म्हणाले, डाॅक्टर आता मनोजभाईंचे वजन चेक करतील, पण त्यांचे वजन किती आहे, हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीला सुरुवातीपासून माझा पाठिंबा राहिला आहे. २०१५ मध्ये आमदार असतांना विधानसभेत मी केलेले भाषण तुम्ही ऐका, मी सातत्याने मराठा आरक्षणाच्या मागणीचे समर्थनच केले आहे. आज अंतरवाली सराटी सारख्या छोट्याशा गावात सगळ्याच राजकीय पक्षांचे पुढारी मोठ्या गाड्या, हेलीकाॅप्टर आणि खाजगी विमानं घेऊन येत आहेत. कारण त्यांचे भवितव्य तुमच्या हातात आहे.

मराठा समाजाप्रमाणेच मुस्लिमांना चार टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला होता. पण त्याकडेही सरकारने दुर्लक्ष केले. राज्याच्या सत्तेत सर्वाधिक काळ मराठा समाजाचे नेते होते, पण त्यांनी कधी समाजातील दुर्लक्षित घटकाकडे पाहिलेच नाही. पण मनोज जरांगे पाटील यांनी त्या सगळ्यांना या गावात पळत यायला भाग पाडलं. हे सरकार तुमची परीक्षा पाहत आहे. आज ना उद्या उपोषण संपेल, सगळे निघून जातील याची ते वाट पहात आहेत. पण तुम्ही हा लढा सुरू ठेवा, आरक्षणाची लढाई खूप मोठी आहे, ती लढण्यासाठी तुमच्या अंगात ताकद असायला हवी. ती नसेल तर लढण्याचे बळ कमी होते. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, उपोषण मागे घ्या. एक मराठा लाख मराठांना सोबत घेऊन थेट मुंबईत धडक द्या, असे आवाहनही इम्तियाज जलील यांनी केले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT