Parbhani : मराठवाड्याच्या विकासासाठी सातत्याने विविध विकास योजना सरकारकडे सुपूर्द करून त्यांची अंमलबजावणी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या स्वेच्छा निवृत्तीचा निर्णयास राज्य सरकारने मान्यता द्यायला नको होती. (Mp Jadahv On Kendrekar News) सरकारला विकासभिमुख अधिकारी नको आहेत, अशी टीका खासदार संजय जाधव यांनी केली आहे.
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Commissinore) यांच्या स्वेच्छा निवृत्तीचे पडसाद उमटायला लागले आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी थेट सरकावर केंद्रेकरांवर दबाव आणल्याचा आरोप केला होता. (Shivsena) त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार जाधव यांनी देखील केंद्रेकरांच्या स्वेच्छा निवृत्तीच्या निर्णयावर भाष्य केले आहे.
राज्य सरकारला विकासात्मक, कर्तव्यदक्ष व प्रामाणिक अधिकारी नकोत. आयुक्त केंद्रेकर यांच्या स्वेच्छा निवृत्तीबाबत सर्वसामान्यांमधून उमटत असलेल्या प्रतिक्रिया पाहता सरकारने त्यांचा अर्ज मंजुर करायला नको होता. यावरून या सरकारची भूमिका लक्षात येते. (Sanjay Jadhav) मराठवाड्याच्या विकासासाठी आवश्यक त्या शिफारसी करण्याचे काम केंद्रेकर यांनी केले.
शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून त्यांना खरीप हंगामापूर्वी दहा हजार रुपये रोख रक्कम ही बियाणे व खतासाठी दिली जावी, अशी शिफारस केली होती. मराठवाड्यात शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून त्यांनी हा निष्कर्ष काढला होता. मात्र या प्रस्तावावर राज्य सरकारमधील काही मंडळींची इच्छाशक्ती नसल्याचे दिसून आले. त्यातूनच सरकारमधील काही नेत्यांनी केंद्रेकर विरोधी भूमिका घेतली. या प्रस्तावाबरोबरच मराठवाडा प्रकल्पापासून ते मराठवाड्यातील साखर कारखानदारी बंद करून ती इतरत्र हलवावी, अशी शिफारसही केंद्रकरांनी केली होती.
मराठवाड्याचे मागासले पण दूर करण्यासाठी शासनाला त्यांनी उपायोजना सुचविल्या होत्या. मात्र या सूचना राज्य सरकारमधील काही नतदृष्ट मंडळींना पटल्या नाहीत. यातूनच केंद्रीकरांनी निवृत्तीचा अर्ज दिला होता. परंतु शासनाने तो नाकारणे ऐवजी तातडीने मंजूर केला. यावरून या सरकारला चांगल्या अधिकाऱ्यांची किंमत नसल्याचे दिसून येते. सरकारला सोयीच्या दृष्टीने असलेले अधिकारी हवे आहेत, त्यामुळे विभागीय आयुक्त केंद्रेकर यांना घालवण्याची घाई या सरकारला झाली होती, असा आरोप देखील जाधव यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.