Osmanabad Politics
Osmanabad Politics  
मराठवाडा

'तू तूझ्या औकातीत राहा': ओमराजेंनी राणा पाटलांना सुनावले

सरकारनामा ब्युरो

Osmanabad Politics : उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि भाजप (BJP) आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याची माहिती समोर आली आहे. पिकविम्याच्या मुद्द्यावरून उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातच दोघांमध्येही बाचाबाची झाल्याने वातावरण तापलं होतं. 'तू जास्त बोलू नकोस, तू तूझ्या औकातीत राहा, तुझे संस्कार तुझी औकात मला ठाऊक आहे, अशा शब्दात ओमराजे निंबाळकर यांनी आमदार राणा पाटील यांना सुनावलं.

मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद जिल्ह्याधिकारी कार्यालयात आज आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पीक विम्याच्या खरीप हंगामात झालेल्या नुकसान या संदर्भात बैठक बोलावली होती. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमोरच पीकविम्याच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. बैठक सुरु असताना, राणा पाटील यांनी पीकविमा देताना कंपन्यांकडून भेदभाव केला जातो. प्रशानाकडून पंचनाम्याची पावती घेण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला. पण त्याचवेळी, प्रशासनाकडे पंचनाम्याच्या पावत्याच नाहीत, तर शेतकऱ्यांची फसवणूक का करताय? असा संतप्त सवाल खासदार निंबाळकर यांनी केला.

याचवेळी ओम राजेनिंबाळकर यांना उत्तर देताना राणा पाटील यांनी त्यांचा 'बाळा' असा उल्लेख केला.पण संतापलेल्या ओमराजे यांनी 'तू तुझ्या औकातीत राहा, तुझी आणि तुझ्या खानदानाची औकात आणि संस्कार सर्वांनाच माहीत आहेत,' असं म्हणत राणा पाटील यांच्यावर आगपाखड केली. इतकेच नव्हे तर, 374 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पडत असताना विमा कंपनीचे हे लोकच एजंटगिरी करतात. सर्वोच्च न्यायालयाने पीकविमा देण्याचे आदेश दिल्यानंतरही ते दिले जात नसतील तर शेतकऱ्यांना वेठीस धरू नका, अशी मागणीही यावेळी ओमराजे निंबाळकर यांनी केली .

दरम्यान, आमदार पाटील यांनी या बैठकीसाठी काही शेतकऱ्यांना निरोप दिला. त्यावरुन काही शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात हजर झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांशी बैठकीसाठी सकाळी 11 वाजताची वेळ या ठरली होती. पण 1 वाजले तरी बैठक सुरु झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी गोंधळ घालायला सुरवात केल्याने काही वेळासाठी वातावरण चांगलंच तापलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT